पुणे:-पुणेकरांच्या देशभक्तीचा भव्य उत्सव : ‘ऑपरेशन सिंदूर’ च्या यशाचा तिरंगा यात्रेद्वारे जल्लोष.
पत्रकार राजेंद्र पवार हवेली तालुका कार्याध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार राजेंद्र पवार हवेली तालुका कार्याध्यक्ष
RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत )
पुणेकरांच्या देशभक्तीचा भव्य उत्सव : ‘ऑपरेशन सिंदूर’ च्या यशाचा तिरंगा यात्रेद्वारे जल्लोष.
पुणे, ता. 19 मे २०२५ :
देशभक्त पुणेकरांनी आज अभूतपूर्व उत्साहात ‘तिरंगा यात्रा’ काढून भारतीय सैन्याच्या शौर्याला आणि ‘ऑपरेशन सिंदूर’च्या यशाला सलाम केला. पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर थेट हल्ला करत भारतीय सैन्याने अलीकडेच अंमलात आणलेल्या या ऑपरेशनने संपूर्ण देशाचे मनोबल उंचावले आहे.
या ऐतिहासिक क्षणाचा गौरव करण्यासाठी आणि वीर जवानांच्या सन्मानार्थ पुणे शहरात आयोजित करण्यात आलेल्या तिरंगा यात्रेत हजारो नागरिकांनी सहभाग घेतला.
यात्रेचे नेतृत्व केंद्रीय राज्यमंत्री मा. मुरलीधर आण्णा मोहोळ यांनी केले. त्यांच्या सोबत शहराध्यक्ष धीरज घाटे, खासदार डॉ. मेधा कुलकर्णी, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे, आमदार हेमंत रासने, सिद्धार्थ शिरोळे, भिमराव तापकीर, सुनील कांबळे, योगेश टिळेकर, माजी आमदार जगदीश मुळीक, श्रीनाथ भिमाले, सनी पवार यांसह अनेक मान्यवर पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले.
यात्रेदरम्यान ‘भारत माता की जय’, ‘जय जवान जय हिंद’ असे घोष समाजमनात देशभक्ती जागवत होते. संपूर्ण शहर देशभक्तीच्या रंगात रंगून गेले होते.
ही तिरंगा यात्रा म्हणजे भारतीय सैन्याच्या शौर्याला आणि मातृभूमीवरील प्रेमाला दिलेला पुणेकरांचा सामूहिक सलाम होता.