सातारा:-बालिका पंचायत क्षमता बांधणी कार्यशाळा.
पत्रकार मारुती सोमूत्ते पुणे जिल्हा उपाध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार मारुती सोमूत्ते पुणे जिल्हा उपाध्यक्ष
RPS STAR NEWS
बालिका पंचायत क्षमता बांधणी कार्यशाळा.
(Balika Panchayat Capacity Building Workshop)
दिनांक :- १८ मे २०२४
ठिकाण :- सातारा
सहभागी :- ५४ (किशोरवयीन मुली)
दिवस पहिला
निर्माण बहुउद्देशीय विकास संस्था निर्भया प्रकल्पाच्या* माध्यमातून बालिका पंचायत क्षमता बांधणी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. सदरच्या कार्यशाळेसाठी गोडोली, भीमनगर, लक्ष्मी टेकडी, मंडई कॉलनी, म्हसवे, आकाशवाणी व मतकर कॉलनी येथील किशोरवयीन मुली उपस्थित होत्या.
सदरच्या कार्यशाळेसाठी प्रमुख पाहुणे म्हणून मासूम संस्थेचे प्रतिनिधी योगेश हूपरीकर सर उपस्थित होते. गोडोली बालिका पंचायत मधील मुलींनी स्वागत पर गीत गायले व कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुण्यांचे स्वागत करून करण्यात आली.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला एक उपक्रम घेण्यात आला ज्यामध्ये काल्पनिक देश तयार करण्यास सांगण्यात आले व त्यातून मानवी हक्क संकल्पना स्पष्ट करून देण्यात आली. मानवी हक्क एकूण ३० आहेत व कोणते आहेत हे जाणून घेतले, तसेच प्रत्येक जन्माला येणाऱ्या व्यक्तीला हे जन्मजात मानवी हक्क असंतात याबद्दलची माहिती देण्यात आली. तसेच मानवी हक्क पासून कोणकोणते लोक वंचित असतात व हक्क काम मिळत नाहीत याबद्दलची चर्चा करण्यात आली.
कार्यशाळेच्या दुसऱ्या सत्रात पुरुष व महिला यांची कामे कोणती त्यातून लिंग व लिंगभाव यातील फरक काय मुलगा व मुलगी यांच्यातील यांच्यातील भेदभाव तसेच घरातील कामे व त्यातून होणारा भेदभाव याबद्दल सांगितले, तसेच घरामध्ये समानता कशाप्रकारे येऊ शकते व समानता म्हणजे काय याबद्दलची माहिती खेळामधून देण्यात आली. घरामध्ये समानता कशाप्रकारे येऊ शकते याबाबतचे चित्र मुलींना काढण्यासाठी काढण्यास सांगितले.
सदरच्या कार्यशाळेवेळी निर्माण संस्थेचे विक्रांत मोरे, रमेश पुजारी, सुचिता सातपुते, कल्पना केंजळे, काजल गायकवाड, विद्या गडकरी व सायली पडवळ हे उपस्थित होते.