वाई:- किसन वीर महाविद्यालयाचा बारावीचा निकाल ९०.९७ टक्के.
पत्रकार वैष्णवी शिंदे पुणे जिल्हा महिला संघटक

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार वैष्णवी शिंदे पुणे जिल्हा महिला संघटक
RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत )
वाई दि.8
किसन वीर महाविद्यालयाचा बारावीचा निकाल ९०.९७ टक्के.
वाई : बारावी बोर्ड परीक्षेत जनता शिक्षण संस्थेच्या किसन वीर महाविद्यालयाने उज्ज्वल यश संपादन केले आहे. महाविद्यालयाचा एकूण निकाल ९०.९७. टक्के लागला आहे. यामध्ये १९ विद्यार्थी विशेष प्राविण्यासह व ७९ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.
कला शाखेचा निकाल ७४.१७ टक्के लागला असून, यामध्ये कु . सायुरी सणस हिने ९२.०० % गुण मिळवून प्रथम क्रमांक, श्री मयूर साळुंखे याने ७७.३३ % गुण मिळवून द्वितीय क्रमांक तर कु. भक्ती माने हिने ७६.१७ % गुण मिळवून तृतीय क्रमांक प्राप्त केला.
वाणिज्य शाखेचा निकाल ९०.०३ % टक्के लागला असून, यामध्ये कु. अर्पिता जोशी हिने ९१.१७ % गुण मिळवून प्रथम क्रमांक, श्री. सुहास यादव याने ८४.५० % गुण मिळवून द्वितीय क्रमांक तर कु. निकिता खुडे हिने ८२.३० % गुण मिळवून तृतीय क्रमांक प्राप्त केला.
विज्ञान शाखेचा निकाल : ९७.६३ % लागला असून यामध्ये कु. स्नेहल मानकुंबरे हिने ८७.५० % गुण मिळवून प्रथम क्रमांक कु. वेदिका
शेवडे हिने ८३.५० % गुण मिळवून द्वितीय क्रमांक तर कु. पूर्वा फणसे हिने ७९.३३ % गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळविला.
सर्व विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष मदन भोसले, उपाध्यक्ष शंकरराव गाढवे, सचिव डॉ. जयवंत चौधरी, प्रा. नारायण चौधरी, प्राचार्य डॉ. गुरुनाथ फगरे, उपप्राचार्य श्री. बाळासाहेब कोकरे, पर्यवेक्षक श्री. अर्जुन जाधव आदींनी कौतुक केले.