ताज्या घडामोडी

सुपा:-(पारनेर)-`दै.अक्षराज’ चे पत्रकार वसंत रांधवण यांना `पारनेर भूषण’ पुरस्कार जाहीर.

पत्रकार राजकुमार इकडे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष 

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

 पत्रकार राजकुमार इकडे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष

RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृती )

`दै.अक्षराज’ चे पत्रकार वसंत रांधवण यांना `पारनेर भूषण’ पुरस्कार जाहीर.

महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथे पुरस्कार सोहळा.

दि.८,सुपा (पारनेर) : पारनेर तालुक्यातील टाकळीढोकेश्वर येथिल रहिवासी पारनेरचे भूमिपुत्र व अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे पारनेर तालुका उपाध्यक्ष तसेच महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ पारनेर तालुका उपाध्यक्ष पत्रकार वसंत रांधवण यांची राज्यातील गरुड फाउंडेशन, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने दिला जाणारा राज्यस्तरीय पारनेर भूषण पुरस्कार २०२५ करीता नुकतीच निवड करण्यात आली असल्याचे गरुड फाउंडेशनचे कार्याध्यक्ष तथा आयोजक रमेश खेमनर यांनी वसंत भानुदास रांधवण यांना निवडीचे पत्र देऊन कळविले आहे.
शनिवार दि.७ जून २०२५ रोजी सकाळी ११ वाजता महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी या ठिकाणी विविध क्षेत्रातील नामवंत लेखक आणि मान्यवरांच्या उपस्थितीत राज्यस्तरीय पारनेर भूषण पुरस्कार २०२५ देऊन वसंत रांधवण यांना सन्मानित करण्यात येणार आहे.
वसंतराव रांधवण पारनेर तालुक्यातील पत्रकार असून, निर्भिडपणे ग्रामीण भागातील प्रश्न मांडत आहे. अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे पारनेर तालुका उपाध्यक्ष तसेच महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ पारनेर तालुका उपाध्यक्ष म्हणून ते कार्यरत आहे. समाज सुधारकांच्या जयंती साजरी करणे, विविध सामाजिक कार्यक्रमात सहभाग घेऊन मागिल १६ वर्षापासून सातत्याने सामाजिक कार्य करत आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांना राज्यस्तरीय पारनेर भूषण पुरस्कार जाहीर केला असल्याचे गरुड फाउंडेशनचे अध्यक्ष आकाश पुजारी व आयोजक रमेश खेमनर यांनी सांगितले.
हा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल दैनिक अक्षराज मिडियाचे मुख्य संपादक विनोद गोरे, सहसंपादीका प्राजक्ता चव्हाण -गोरे, खासदार निलेश लंके, आमदार काशिनाथ दाते,खासदार निलेश लंके , निलेश लंके प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाळासाहेब खिलारी, पारनेर तालुक्यासह जिल्ह्यातील पत्रकारांनी, सामाजिक, राजकीय सर्वच क्षेत्रातून वसंत रांधवण यांचे अभिनंदन होत आहे.

RPS STAR NEWS YOUTUBE चॅनेल ला LIKE, FOLLOW, SUBSCRIBE आणि COMMENT करा.

ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button