माळेवाडी:-विद्यार्थांना प्रोत्साहन मिळाल्याने गुणवत्ता वाढते उपप्रादेशिक अधिकारी राणीताई सोनवणे.
पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुकाध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुकाध्यक्ष
RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत )
विद्यार्थांना प्रोत्साहन मिळाल्याने गुणवत्ता वाढते उपप्रादेशिक अधिकारी राणीताई सोनवणे.
माळेवाडी ( प्रतिनिधी ) जिल्हा परिषद सेमी इंग्लिश स्कूल माळेवाडी शाळेत नुकताच विद्यार्थ्यां चा गुणगौरव सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला . चालु शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या वेगवेगळ्या स्पर्धामधील यशाबद्दल विद्यार्थ्यांचा शाळेत सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता . यावेळी श्रीरामपूर विभागाचे उपप्रादेशिक अधिकारी राणी सोनवणे यांनी विद्यार्थ्यांना वाहतुकीचे नियम आणि रस्त्यावर चालताना घ्यावयाची काळजी याबद्दलचे मार्गदर्शन केले विद्यार्थ्यांना जर चांगल्या प्रकारचे प्रोत्साहन मिळाले तर निश्चितपणे त्यांची गुणवत्ता वाढते आणि शाळेचा शैक्षणिक आलेख उंचावतो असे त्यांनी गौरवोद्गार काढले . शाळेत घेण्यात आलेल्या अखिल भारतीय साने गुरूजी कथामाला संस्कार स्पर्धापरीक्षा मुंबई तसेच साई कलाविष्कार संस्था पुणे यांच्या चित्रंगभरण परीक्षेत विजेत्या ठरलेल्या विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह . मेडल . सन्मानपत्र आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला . जिल्हा परिषद अहिल्यानगर अंतर्गत मिशन आरंभ इयत्ता चौथी शिष्यवृत्ती परीक्षेत तालुकास्तरीय गुणवत्ता यादीत आलेल्या विद्यार्थ्यांचाही सन्मान करण्यात आला जिल्हास्तरावर निवड झालेल्या आणि तालुका स्तरावर प्रथम आलेल्या सांस्कृतिक स्पर्धेतील बालकलाकारांचाही गुणगौरव करण्यात आला . केंद्रस्तरीय लांब उडी . उंच उडी ‘ धावणे कथाकथन ‘ आणि वकृत्वस्पर्धेत केंद्रात यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह ‘ प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला . याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष सेवानिवृत्त मुख्याध्यापक भागचंद्र ओताडे श्रीरामपुर पोलीस स्टेशनचे ठाणे अंतलदार पोलीस नाईक किरण टेकाळे ‘ गृहरक्षक दलाचे राजेंद्र देसाई मा . सरपंच सोपानराव औताडे ‘ उपसपंच भागुबाई मगन घोडके ‘ आयडीबीआय बँकेचे शाखाधिकारी पवन आत्राम . असिस्टंड मॅनेजर मिथिलेश कुमार . शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष भाऊसाहेव ठाकरे ‘ एकनाथ ठाकरे . सराल्याचे सरपंच शंकर विटेकर . किरण बनसोडे . बबन तात्या औताडे . रवींद्र मोहन . प्रकाश मोहन . आशाबाई फुलारे . त्तायार शेख . रामभाऊ वमने . देविदास वमने वैभव नेद्रे . गणेश लबडे . विजय मोहन . अविनाश उमाप . अंकुश मोहन . सोनल औताडे . मनोज घोडके . सचिन वमने . विलास औताडे राहुल औताडे . जाकीर शहा . कालिंदी वमने रुपाली घोडके रेश्मा शेख . शीतल ठाकरे आसाराम लबडे सुवर्ण वमने सुनीता ठाकरे . शांता मोहन आदी शिक्षण प्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते . कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपक्रमशील शिक्षक रज्जाक शेख यांनी केले आणि आभार मुख्याध्यापक राजू भालेराव यांनी मानले . कार्यक्रम यशस्वीतेसाठी सारिका लोखंडे . मीरा ससाने,मीनाक्षी जाधव यांनी परिश्रम घेतले.
RPS STAR NEWS YOUTUBE चॅनेल ला LIKE, FOLLOW, SUBSCRIBE आणि COMMENT करा.
ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन