कृषी व व्यापारताज्या घडामोडीमहाराष्ट्र

दापोल:- भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई न केल्यास दापोली तहलिसदार कार्यालयासमोर “आत्मदहन” करण्याचा मयूर मधुकर मोहिते यांचा इशारा.

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717484

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत )

दापोल:- भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई न केल्यास दापोली तहलिसदार कार्यालयासमोर “आत्मदहन” करण्याचा मयूर मधुकर मोहिते यांचा इशारा.

गाव मौजे बुरोंडी व पाजपंढरी येथील मच्छि कट्टा बांधकामात झालेल्या भ्रष्टाचाराबाबत मयूर मधुकर मोहिते यांनी आवाज उठविला होता व त्या बाबत दि. 26/01/2025 रोजी उपोषण केलेले होते.यावेळी सखोल चौकशी करून कार्यवाही करण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांनी आश्वासन दिले होते.मात्र त्या आश्वासनानुसार आजतागायत संबंधित व्यक्तींवर काहीही कार्यवाही झालेली नाही. उलट पत्तन विभागाचे दापोली कार्यालयात मयूर मधुकर मोहिते माहिती घेण्यास गेले असताना तेथे उपस्थित असलेले अधिकारी राकेश जाधव यांनी मोहिते यांना मारहाण केली व धाकदपटशा दाखवून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न चालू केला आहे. केवळ भ्रष्ट कर्मचा-यांची बदली करण्यावरच सदरचे प्रकरण थांबले आहे.
एकंदर खात्याचा कारभार पाहता मौजे बुरोंडी व पाजपंढरी येथील मच्छि कट्टा बांधकामात झालेल्या भ्रष्टाचाराबाबत संबंधितांविरोधात कार्यवाही / कारवाई करण्याचा पत्तन विभागाचा मानस दिसून येत नसल्यामुळे मयूर मधुकर मोहिते यांनी न्याय मिळविण्यासाठी नाईलाजास्तव “आत्मदहन” करण्याची वेळ आलेली आहे असे स्पष्ट केले आहे.

भ्रष्ट प्रकरणामध्ये सामील असलेले कर्मचारी श्री.राकेश रमेश जाधव स्था.अभियांत्रिकी सहाय्यक पत्तन उपविभाग दापोली, श्री.बी.एल.हजारे माजी कार्यकारी अभियंता सा.बां. दक्षिण विभाग, कोल्हापूर तथा तत्कालीन पत्तन अभियंता, पत्तन विभाग रत्नागिरी आणि श्री.व्ही. आय.स्वामी,सहा.पत्तन अभियंता पाणलोट बंधारा उपविभाग तथा तत्कालिन सहा.पत्तन अभियंता पत्तन उपविभाग दापोली यांचे विरोधात निलंबणाची कारवाई करून फौजदारी स्वरूपाची कारवाई करण्यात यावी व त्यांचे विरोधात कामात हलगर्जीपणा करणे, भ्रष्टाचार करणे, शासकीय मालमत्ता हडप करणे वगैरे बाबत गुन्हा दाखल करण्यात यावा. श्री.राकेश रमेश जाधव स्था.अभियांत्रिकी सहाय्यक पत्तन उपविभाग दापोली, श्री. बी. एल. हजारे माजी कार्यकारी अभियंता सा.बां.दक्षिण विभाग, कोल्हापूर तथा तत्कालीन पत्तन अभियंता, पत्तन विभाग रत्नागिरी आणि श्री. व्ही. आय. स्वामी, सहा. पत्तन अभियंता पाणलोट बंधारा उपविभाग तथा तत्कालिन सहा. पत्तन अभियंता पत्तन उपविभाग दापोली यांचे विरोधात कडक कारवाई न केल्यास दि. 01 मे 2025 रोजी सकाळपासून उपोषण व दि. 02 मे 2025 रोजी सायंकाळी 5.00 वा.दापोली तहलिसदार कार्यालयासमोर “आत्मदहन” करणार असल्याची माहिती मयूर मधुकर मोहिते यांनी दिली. यानंतर होणारे सर्व परिणामांची सर्वस्वी जबाबदारी कार्यालयाची राहील याची नोंद घेण्याचे त्यांनी स्पष्ट केले.

RPS STAR NEWS YOUTUBE चॅनेल ला LIKE, FOLLOW, SUBSCRIBE आणि COMMENT करा.

ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button