वैजापूर येथे शिवराम मंदिर येथे १८ वा वर्धापनदिन सोहळा संपन्न.
पत्रकार बाळासाहेब सरोदे मराठवाडा संघटक

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार बाळासाहेब सरोदे मराठवाडा संघटक
RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत )
वैजापूर येथे शिवराम मंदिर येथे १८ वा वर्धापनदिन सोहळा संपन्न.
वैजापूर विधानसभेचे लोकप्रिय आमदार प्रा.श्री.रमेश पाटील बोरनारे यांच्या पत्नी सौ.संगीताताई रमेश बोरनारे यांच्याहस्ते कुमारी बिलवा सुरजकुमार तांबे हिचा रामरक्षा स्तोत्र पठन व चि.जयेश योगेश मांजरे याचा ऋग्वेद पठन केल्याबद्दल प्रमाणपत्र दिले व पाल्यांकडून रामरक्षा स्तोत्र व ऋग्वेद पठन करून घेतल्याबद्दल सौ.वैशाली सुरजकुमार तांबे व सौ.ईश्वरी योगेश मांजरे यांचा सत्कार केला.
वैजापूर येथे शिवराम मंदिर येथे १८ वा वर्धापनदिन सोहळा आयोजित करण्यात आला होता त्या निमित्ताने पूर्णवाद ग्रंथ पारायण,निरुपण सोहळा आयोजित करण्यात आला त्यात ऋदगत प्रकरणाचा अभ्यास श्री.मधुसुदनराव चितळेसर, पूर्ण पुरुष, माया प्रकरणाचा अभ्यास पुर्णवादी जेष्ठ शिक्षिका मीना ताई कुलकर्णी यांनी अभ्यासपूर्ण प्रतिपादन केले,विद्या अविद्या प्रकरणावर डॉ.अशोकराव हवेलीकर यांनी व्यवहारातील उदाहरणे देऊन विषय अधिक स्पष्ट केला पुढिल सर्व प्रकरणाचा अभ्यास पूर्णवादी आदर्श शिक्षक श्री. हरिभाऊ धाट सर यांनी पूर्णवाद ग्रंथातील वेद ऋचा, उपनिषदे व व्यवहारातील उदाहरणे देऊन विषय अधिक स्पष्ट केला पूर्ण कार्यक्रमाला वैजापूरचे विद्यमान आमदार माननीय श्री.बोरणारे साहेब यांच्या सुविद्य पत्नी व त्यांच्या सर्व श्रद्धाळू महिला सोबत सौ.संगिताताई…. उपस्थित होत्या.मंदिराचा हॉल सर्व गुरु बंधू भगिनींनी पूर्ण भरलेला होता छोट्या बालकांनी पाठांतर करून रामरक्षा स्तोत्रे मुखोद्गगत न पाहता म्हणून दाखवली नैपुण्यासह प्रार्थना प्रसाद, आग्रहपूर्वक भोजना नंतर कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आ.मांजरेसर यांचे दोन्ही पुत्र,स्नुषा नातवंडे पूर्ण परिवार वैजापूर जी.क.म.अध्यक्ष श्री.संतसाहेब सह परिवार, श्री.सुधिरराव जोशी सर सह परिवार, श्री व सौ.भालेराव, श्री व सौ.पुष्करणे,श्री.टेके सौ.टेके वहिनी, श्री.तांबेसाहेब सह परिवार श्री.वाणीसाहेब श्री.निकमसाहेबांनीभोजणाची उत्तम व्यवस्था केली होती येथील सर्व गुरु बंधू भगिनीं, ग्रामस्थ उपस्थित होते.