क्राईम न्युजताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सातारा:-साताऱ्यात महिला अधिकाऱ्यांच्या स्वकल्याणचे स्वप्न झाले भंग …..

ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा 

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

 ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

RPS STAR NEWS

साताऱ्यात महिला अधिकाऱ्यांच्या स्वकल्याणचे स्वप्न झाले भंग …..

सातारा दि: स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका पुढे ढकलल्यामुळे गेले दीड वर्ष प्रशासनाच्या हाती कारभार आहे . सर्व काही निर्णय त्यांनाच घ्यावे लागत होते. मात्र, साताऱ्यात समाज कल्याण अधिकारी तथा सांगलीतील इतर मागास बहुजन कल्याण विभागातील प्रभारी सहाय्यक संचालक सपना सुखदेव घोळवे या वर्ग एकच्या महिला अधिकाऱ्याने एक लाखाची लाच स्वीकारली. त्याच वेळी त्यांना लातूर प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडून त्यांचे स्वप्न भंग केले. तर समाज कल्याण निरीक्षक दीपक भगवान पाटील यांचाही त्यात हात असल्याने त्यांच्यावरही गुन्हा दाखल करून ताब्यात घेतले .
याबाबत माहिती अशी की, समाजातील उपेक्षित व वंचित असलेल्या भटक्या जाती जमातीच्या विकासासाठी समाज कल्याण विभागाच्या मार्फत भरघोस अनुदान दिले जाते. भटक्या समाजाला मुख्य प्रवाहात आणून त्यांचे जीवनमान उंचावण्याचा प्रयत्न केला जातो. पण ,यामध्ये मोठ्या प्रमाणात निधीमध्ये गळती होत असल्याचे अनेकदा सिद्ध झाले आहे.
साताऱ्यात भटक्या जाती प्रवर्गातील धनगर समाजातील विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाच्या निवासी शाळेत शिक्षण घेण्याकरता खूप परिश्रम व कष्ट घ्यावे लागतात. मात्र आयत्या पिठावर रेगोटी ओढणाऱ्या काही भ्रष्ट अधिकाऱ्यांमुळे हा निधी त्यांच्या स्व कल्याणासाठी जात असतो. यावर निर्बंध घालण्यासाठी या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनीच ५९ लाख ४० हजार रुपयांचे अनुदानाचा धनादेश घेताना दहा टक्के म्हणजे सहा लाख रुपयांची मागणी केली होती. दहा टक्के रक्कम समाज कल्याण अधिकाऱ्याला देण्यापेक्षा संविधानाने दिलेल्या अधिकाराचा वापर करून त्यांना अद्दल घडवण्याचा निश्चय त्या संस्थाचालकांनी केला. त्यांना एक लाख रुपये देण्याचा सौदा ठरवल्यानंतर हा घोळ चव्हाट्यावर आणण्यासाठी सातारा येथील लाख रुपये विभागाकडे लेखी तक्रार करून केली. . सातारा जिल्हा परिषदेच्या इमारतीतील वर्ग एक समाज कल्याण अधिकारी सपना घोळवे या भ्रष्ट महिला अधिकाऱ्यांना चांगलाच धडा शिकवला आहे. एवढेच नव्हे तर त्यांच्या कार्यालयातील समाज कल्याण निरीक्षक दीपक पाटील यांनी सुद्धा अनुदानाचे धनादेश काढण्यासाठी दहा हजार रुपयाची मागणी केली होती. अधिकारीच भ्रष्ट असेल तर कनिष्ठ कर्मचारी सुद्धा मग पैसे घेण्यास मागे पुढे पाहत नाही.
साताऱ्यात हे नेहमीच घडत असते पण तक्रार देण्यास कोणी पुढे येत नव्हते .ज्या भटक्या जाती- जमातीसाठी काम करणाऱ्या शिक्षण संस्थेने लाच लुचपत प्रतिबंधक लोक विभागाकडे तक्रार केल्यामुळे अखेर वर्ग एकच्या अधिकाऱ्याचे स्वप्न भंग करावे लागले. प्रत्येक पुरुषाच्या यशाच्या मागे महिला असते पण समाज कल्याण विभागातच नव्हे तर अनेक विभागांमध्ये पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काही महिलाही आता भ्रष्टाचार करू लागलेले आहेत. हे आता सातारकर यांना अनुभवावे लागत आहे. सातारा जिल्ह्यातील लाथ लुचपत प्रतिबंधक विभागाचे विभागाचे अधिकारी संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक विनायक भिलारे ,दत्तात्रेय पुजारी ,अंमलदार सीमा माने, अजित पाटील, प्रतीक चौगुले ,सलीम माकण दार, धनंजय खाडे, ऋषिकेश वडणीकर सुदर्शन पाटील, पोपट पाटील, रामहरी वाघमोडे, राधिका माने, चंद्रकांत जाधव, विना जाधव ,अनिल वंटमुरे यांनी कारवाई मध्ये सहभाग घेतला. त्यांचे विविध स्तरातून कौतुक होत आहे. लाच देणे व घेणे हा कायदेशीर गुन्हा आहे. हे माहीत असू नये आज सुशिक्षित वर्ग मोठ्या प्रमाणात लाचची मागणी करत आहे. यावर आता आळा घालण्यासाठी तक्रारदारांनीच पुढे यावे. अशी मागणी होऊ लागलेली आहे.
दरम्यान, सातारा जिल्ह्यातील अनेक अधिकाऱ्यांच्या विरोधात माहितीच्या अधिकारात अर्ज केल्यानंतर अशा माहिती कार्यकर्त्यांना बदनामी करण्याची सुपारी दिली जाते. अशीच सुपारी समाज कल्याण अधिकाऱ्यांनीही दिले असेल का? याची आता चौकशी व्हावी. अशी मागणी माहिती अधिकाऱ्याच्या कार्यकर्त्यांनी केलेली आहे.
————————————
सातारा लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतलेले समाज कल्याण अधिकारी सपना घोळवे

ACLS TIMES” YOUTUBE चॅनेल ला LIKE SUBSCRIBE आणि COMMENT करा. 🙏

ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button