पुसेसावळी:-(खटाव)-कार व दुचाकी अपघातात एकाचा जागीच मृत्यू.
प्रतिनिधी सौरभ चव्हाण खटाव:-9503995968

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483
प्रतिनिधी सौरभ चव्हाण खटाव तालुकाध्यक्ष
दिनांक-10/04/2023
कार व दुचाकी अपघातात एकाचा जागीच मृत्यू.
पुसेसावळी. दुचाकी व कारच्या धडकेत एक जण जागीच ठार तर एक महिला गंभीर जखमी झाली. प्रकाश पांडुरंग वाघमोडे वय-45 राहणार देवकरवाडी सातारा असे मृताचे नाव आहे तर प्रकाश यांची पत्नी छाया वाघमोडे वय-38 या गंभीर जखमी झाल्या आहेत. खटाव तालुक्यातील पुसेसावळी कडेपूर रस्त्यावरील गोरेगाव वांगी येथील मानेवस्ती येथे हा अपघात झाला. याबाबत माहिती अशी की प्रकाश वाघमोडे पत्नीसह आपल्या दुचाकी क्रमांक (एम.एच.11बी.एन.1637) वरून कुपवाड मिरज बाजू कडून कडेपूर मार्गे सातारा कडे निघाले होते गोरेगाव वांगी मानेवस्ती येथे आले असता समोरून येणाऱ्या भरधाव कारणे ( एम.एच.10 सी.ए.0804) वाघमोडे यांच्या दुचाकीस धडक दिली यात वाघमोडे यांचा जागीच मृत्यू झाला तर पत्नी गंभीर जखमी झाली. याबाबत दादासो विष्णू घागरे यांनी औंध पोलीस स्टेशनला उशिरा तक्रार दिली. सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गंगाप्रसाद केंद्रे अधिक तपास करीत आहेत.