आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीमहाराष्ट्र

वाई नगरपरिषद वाई आरोग्य विभागाचा मनमानी कारभार.

पत्रकार नित्यानंद मोरे वाई शहर प्रतिनिधी 

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

 पत्रकार नित्यानंद मोरे वाई शहर प्रतिनिधी

RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत )

वाई नगरपरिषद वाई आरोग्य विभागाचा मनमानी कारभार.

वाई
वाई नगरपरिषद वाईच्या हद्दीतील फुले नगर किवरा ओढा पुल येथे मोठ्या प्रमाणावर घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे या ठिकाणी सर्वच प्रकारची घाण कचरा साठलेला असतो मात्र याठिकाणीची घाण कचरा उचलण्यासाठी वाई नगरपरिषद वाई आरोग्य विभाग यांच्या कडून कसलीच दखल घेतली जात नाही नगरपरिषद नियमावली नुसार नगरपरिषदेने त्यांच्या हद्दीतील ओढे नाले तसेच इतर विभागातील घाण कचरा उचलणे बंधनकारक असतानादेखील त्याप्रकारे काम होताना वाई नगरपरिषद वाईच्या आरोग्य विभागाकडून होताना दिसत नाही फुलेनगर किवरा ओढा पुल हा खुप रहदारीचा रस्ता असून येथून मोठ्या प्रमाणात वाहनांचे तसेच सर्व सामान्य जनतेचे येणे जाणे पायी चालू असते यामध्ये लहान मुलांपासून ते वयोवृद्ध नागरिक यांचा मोठ्याप्रमाणात सहभाग असतो मात्र याठिकाणी साठलेल्या घाण कचरा यांची दुर्गंधी हि मोठ्या प्रमाणात याठिकाणी पसरलेली असते याचा त्रास सर्वांच सहन करावा लागत आहे यामुळे येथे मोठ्या प्रमाणावर आरोग्याचा प्रश्न निर्माण होत आहे. मात्र याकडे वाई नगरपरिषद वाईचा आरोग्य विभाग जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून ही सर्व प्रकारची घाण कचरा येथेच पेटवून देते आहे या घाण कचऱ्यामध्ये मोठ्या प्रमाणात प्लॅस्टिक कचरा असतो याचीही दुर्गंधी मोठ्या प्रमाणात येते याकडे वाई नगरपरिषद वाईच्या आरोग्य विभागाने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे वाई नगरपरिषद वाईने सर्व सामान्य जनतेच्या आरोग्याचा खेळ चालवला आहे याबाबत सर्व सामान्य जनतेतून चिंता व्यक्त करण्यात येत आहे.

RPS STAR NEWS YOUTUBE चॅनेल ला LIKE, FOLLOW, SUBSCRIBE आणि COMMENT करा.

ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button