पारनेर:-ओम साई प्रतिष्ठान आयोजित- पायी दिंडी सोहळा!
पत्रकार राजकुमार इकडे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार राजकुमार इकडे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष
RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत )
ओम साई प्रतिष्ठान आयोजित- पायी दिंडी सोहळा!
रांजणगाव!
दि.३ सुपा (अहिल्यानगर)
पारनेर तालुक्यातील रांजणगाव मशिद येथील ओम साई प्रतिष्ठान आयोजित पायी दिंडी सोहळा हा सालाबाद प्रमाणे १६ वे वर्षात पदार्पन करीत असुन रांजणगाव येथील साई मंदीरापासुन आज दि,३ रोजी सकाळी ९ वाजता साईंची आरती होउन पायी दिंडी सोहळा अभियानाला आरंभ झाला ,पायी दिंडी सोहळा हा शिर्डीकडे रवाना झाला असुन पायी दिंडी सोहळा अभियानाला सुपा पंचक्रोशितील अनेक साईभक्त उपस्थित राहील्याचे चित्र पहावयास मिळाले.त्यामधे गावचे सरपंच महेश देशमुख,माजी सरपंच बंटी साबळे ,प्रितमताई शिंदे ,सेवा संस्थेचे चेअरमन अनिल जवक,रांजणगावचेच पण शिर्डी मधेच वास्तव्यास राहीलेले प्रथम साईभक्त ज्ञानेश्वर जवक (माउली)अदी ग्रामस्त, महीला,परीसरातील साईभक्त मंडळीच्या उपस्थित हा पायी दिंडी सोहळा शिर्डीकडे प्रस्थान करण्यात आले,
पायी दिंडी सोहळ्याचे नियोजन सालाबाद प्रमाणे ओम साई प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले.