ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

इंदापूर :-अंबिकानगर मधील नागरिकांचे गैरसोईबद्दल खासदार सुप्रिया सुळे व आमदार दत्तात्रय भरणे यांना निवेदन.

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण :-8208717483.

अंबिकानगर मधील नागरिकांचे गैरसोईबद्दल खासदार सुप्रिया सुळे व आमदार दत्तात्रय भरणे यांना निवेदन.

इंदापूर: इंदापूर येथे बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार मा. सौ. सुप्रिया सुळे यांना, इंदापूर शहरातील भवानी चौक, अंबिका नगर येथील 33 केव्ही लाईन नियमबाह्य पद्धतीने टाकण्याचे काम सुरू असल्याचे व तेरा वर्षातून पहिल्यांदाच झालेला रस्ता जेसीबीने फोडून लोकांची गैरसोय केल्याबाबतचे निवेदन इंदापूर येथील महिलांनी व नागरिकांनी दिले. नागरिकांच्या जीवीतला होणारा संभाव्य धोका व तेरा वर्षातून पहिल्यांदाच झालेला रस्ता तोडफोड केल्यामुळे नागरिकांची होणारी गैरसोय पाहता सुप्रिया सुळे यांनी आमदार दत्तात्रय भरणे यांना तात्काळ याबाबत नागरिकांची अडचण सोडवण्याची सूचना केली. यावर भरणे यांनी लवकरच याबाबत तोडगा काढू असे सांगितले.तसेच राष्ट्रवादीचे जिल्हा अध्यक्ष प्रदिप गारटकर यांनी याबाबत येत्या दोन ते तीन दिवसातच निर्णय घेऊ असे आश्वासन दिले.

जिथून सर्वे झाला तिथून ही33kv ची लाईन न नेता वर्दळीच्या असणाऱ्या लोकवस्तीतील रस्त्यावरूनच नेण्याचा प्रशासनाचा अट्टहास कशासाठी आहे किंवा कोणाचा दबाव आहे असा संतप्त नागरिकांनी सवाल केला.लवकरच येणारे नगरपालिकेचे निवडणूक पाहता शेकडो लोकांचा हा गैरसोयीचा प्रश्न तात्काळ सोडवला जाईल याबाबत नागरिकांना खात्री आहे…

नगरपालिकेसाठी इच्छुक सर्वपक्षीय उमेदवारांनी हा प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत व नागरिकांना पाठिंबा दर्शवून 33 केव्हीची लाईन जिथून सर्वे झाला तेथू घेऊन जा अन्यथा इतर ठिकाणाहून घेऊन जा आणि नादुरुस्त केलेला रस्ता लवकरात लवकर दुरुस्त करण्यात यावा अशी मागणी केली आहे. यात कोणाचे हितसंबंध आहेत व शेकडो नागरिकांच्या जीविताशी खेळण्याचा प्रशासनाने प्रयत्न करू नये अन्यथा नागरिकांच्या रोशाला सामोरे जावे लागेल असेही त्यांनी सांगितले.

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button