वाई:-महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे वाई विधानसभा अध्यक्ष प्रणित मोरे यांना पोलीस अधिकारी यांच्याकडून अपमानास्पद वागणूक.
पत्रकार नित्यानंद मोरे वाई शहर प्रतिनिधी

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार नित्यानंद मोरे वाई शहर प्रतिनिधी
RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत )
महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे वाई विधानसभा अध्यक्ष प्रणित मोरे यांना पोलीस अधिकारी यांच्याकडून अपमानास्पद वागणूक.
महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे वाई विधानसभा अध्यक्ष प्रणित मोरे यांना अपमानास्पद वागणूक देऊन, खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी देणाऱ्या एपीआय गवळींची चौकशी करून कारवाई करा. महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे वाई प्रांताधिकारी आणि वाई डिवायएसपी यांना निवेदन देण्यात आले.
नित्यानंद मोरे ,वाई प्रतिनिधी
दिनांक 25 मार्च रोजी वाई पाचवड रस्त्यालगत असणाऱ्या भीम नगर या 40 ते 50 वर्षांपूर्वीच्या वसाहतीवर न्यायालयाच्या आदेशाने कब्जा देण्याचे प्रशासकीय कारवाई सुरू होती. यावेळी चळवळी प्रति, समाजाप्रती स्वतःची नैतिक जबाबदारी म्हणून महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे वाई विधानसभा अध्यक्ष प्रणित मोरे तेथे भीम नगर मध्ये रहिवाशी असणाऱ्या त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना घरातील साहित्य, पत्रा काढू लागण्याकरिता सकाळी अकरा वाजल्यापासूनच उपस्थित होते. दुपारच्या वेळी वाई पोलीस स्टेशनचे एपीआय गवळी यांनी प्रणित मोरे आणि त्यांच्यासोबत असणाऱ्या सहकाऱ्यांना बोलवल तुम्ही येथे कशाला थांबलाय ,बाहेर जाऊन थांबा असे बोलून ढकलण्यास सुरुवात केली आणि प्रतिउत्तर केल्यास प्रणित मोरे यांना तेथून सरकारी पिंजरा गाडीत नेऊन बसवण्यात आले. काही तासानंतर पुन्हा चतुर्थी हॉटेल येते प्रणित मोरे यांना घेऊन गेल्यानंतर तेथे एपीआय गवळी यांनी तू खूप माजलास का? तुझ्यावर सरकारी कामात अडथळा आणण्याचा गुन्हा दाखल करेल, तुला माझ्यामागे नागपूर- जळगाव पर्यंत हेलपाटे मारायला लावेल अशी अपमानास्पद आणि धमकी वजा भाषा वापरली. या घटनेनंतर वाईतील आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांनी या गोष्टीचा तीव्र निषेध व्यक्त केलाच त्याच बरोबर महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष माननीय किरण बगाडे यांनी तात्काळ 26 मार्च रोजी उपस्थित राहून डीवायएसपी वाई आणि वाई प्रांताधिकारी यांना अशा जातीय मानसिकतेतून चळवळीतील कार्यकर्त्यांना मुद्दामून अपमान कारक वागणूक देणाऱ्या एपीआय गवळी यांची चौकशी करा आणि त्यांच्यावर कारवाई करा असे निवेदन दिले. यावेळी स्वतः प्रणित मोरे, वाई तालुका अध्यक्ष विजय सातपुते, वाई तालुका युवक अध्यक्ष आकाश गायकवाड, वाई तालुका युवक उपाध्यक्ष रोहित कवळे, अक्षय भाई गायकवाड, प्रथमेश कांबळे , राज भाई गायकवाड आणि महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी बोलताना किरण बागडे यांनी असे सांगितले की चळवळीतील कार्यकर्त्यांचा होणारा हा अपमान कदापि सहन करून घेतला जाणार नाही जर का एपीआय गवळी यांची चौकशी करून कारवाई करण्यात नाही आली तर मात्र येत्या काही दिवसात महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे संस्थापक अध्यक्ष संजय भैय्या सोनवणे यांची भेट घेऊन त्यांना सोबत घेऊन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना देखील कारवाई करा या आशियाचे निवेदन देण्यात येईल ही माहिती प्रसार माध्यमांना दिली.