गोखली:- सुवर्ण जयंती महराजस्व अभियानाअंतर्गत सरपंच नंदकुमार गावडे यांच्या वाढदिवसानिमित्तगोखळी येथे शिधापत्रिका वाटप.
प्रतिनिधि:- कुणाल शिंदे फलटण

गोखळी.
सुवर्ण जयंती महाराजस्व अभियानांतर्गत व मा. सरपंच नंदकुमार गावडे यांच्या वाढदिवसानिमित्त गोखळी येथे शिधापत्रिका वाटप करण्यात आले.
गोखळी गावचे मा.सरपंच श्री नंदकुमार गावडे (मामा)यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून गोखळी मध्ये सुवर्ण जयंती महाराजस्व अभियान अंतर्गत तहसील कार्यालय फलटण पुरवठा शाखा यांच्या अंतर्गत शिधापत्रिका वाटप करण्यात आले.
यामध्ये शिधापत्रिके मध्ये नाव वाढवणे २०. शिधापत्रिके मधून नावे कमी करणे १०. गहाळ शिधापत्रिका व दुबार शिधापत्रिका नवीन देणे २८. असे ५८ लाभार्थ्यांना याचा लाभ मिळाला.
शिधापत्रिका नवीन काढणे त्यामध्ये नाव वाढवणे किंवा नाव कमी करणे यासाठी ग्रामीण भागातील लोकांना फलटण ला जाऊन हे काम करण्यासाठी दोन ते तीन दिवस लागतात परंतु गोखळी गावातील सामाजिक कार्यकर्ते श्री राहुल गावडे यांनी गोखळी गावामध्ये ही मोहीम राबवून लोकांना गावांमध्येच शिधापत्रिका उपलब्ध करून दिले.
यावेळी या कार्यक्रमासाठी गोखळी गावचे मा.सरपंच नंदकुमार (मामा) गावडे डॉ.राधेश्याम गावडे शिवाजी कुंभार सुनील आप्पा गावडे त्रिंबक बाराते नारायण आटोळे प्रदीप आटोळे सुनील धुमाळ ज्ञानेश्वर घाडगे शेखर लोंढे शांताराम गावडे निलेश गावडे मुन्ना शेख आदी मान्यवर उपस्थित होते
यावेळी श्री राहुल गावडे यांचा गोखळी ग्रामस्थांच्यावतीने सत्कार करण्यात आला.
तसेच श्रीकांत जाधव यांनी मनोगत व्यक्त केले. राधेश्याम जाधव यांनी सूत्रसंचालन केले. व डॉ.गणेश गावडे यांनी आभार मानले.