जावळी:-बामणोली कसबे परिसरात महसूल विभागाच्या वतीने यशस्वी ग्रामसभा ठराव…
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत
बामणोली कसबे परिसरात महसूल विभागाच्या वतीने यशस्वी ग्रामसभा ठराव…
बामणोली दि: सातारचे जिल्हाधिकारी श्री संतोष पाटील यांच्या संकल्पनेतून महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख कार्यक्षम गतिमान व्हावे यासाठी महसूल सेवा पंधरवडा सुरू केला आहे. त्याचाच भाग म्हणून जावळी तालुक्यातील बामणोली कसबे परिसरात महसूल विभागाच्या वतीने यशस्वी ग्रामसभा ठराव घेण्यात आले. या ग्रामसभेला मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ उपस्थित राहिले.
जावळी तालुक्यातील अतिदुर्गम व मागास भाग असलेल्या परिसरात १७ ते २२ सप्टेंबर पहिल्या टप्प्यात पाणंद रस्ते विषयक मोहीम राबविण्यात आली. तसेच गाव शिवार फेरी, गावातील प्रत्येक रस्त्याची यादी तयार करणे. ग्रामसभा घेऊन यादी अंतिम करणे. ग्राम ठरावाचं यादी तहसीलदारांना सादर करणे. रस्त्याबाबत प्रस्ताव सादर करणे. गाव नकाशाचे रस्त्यात बाबत आवश्यक ठिकाणी सीमांकन करणे. तसेच रस्त्याच्या नोंदी करणे. आदीबाबत महत्वपूर्ण माहिती देण्यात आली. कास,अंधारी,मुनावळे मंडल बामणोली येथील ग्राम सभेमध्ये शिवार फेरी दरम्यान मिळून आलेल्या सर्व ग्रामीण रस्ते,पाणंद रस्ते,गाडी मार्ग,पायवाट इत्यादी नकाशावरील ग्रामीण रस्त्यांच्या यादीचे गाव नकाशावर असलेले रस्ते – प्रपत्र १ व गाव नकाशावर नसलेले रस्ते – प्रपत्र २ चे वाचन करून ग्राम सभेत ठराव करण्याचे सूचित करण्यात आले.तसेच खातेदारांना पीक पाहणी, फार्मर आयडी काढण्याच्या सूचना देण्यात आल्या.
या ग्रामसभेला मंडल अधिकारी प्रकाश गाडे, तलाठी कैलास म्हैसनवाड, कैलास शिवथरे, राजेंद्र कांबळे, प्रकाश भोसले, निलेश भोसले, सुधीर पवार, किरण भोसले ,विजय सपकाळ, धोंडीबा पवार, संदीप जाधव यांच्यासह ग्रुप ग्रामपंचायतचे ग्रामस्थ, सरपंच, उपसरपंच व सोसायटी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.




