वाई नगरपरिषद हाल चाल रजिस्टरची पाने कोरी कर्मचाऱ्यांचा कारभार भारी मात्र नागरीकांची होतेय ऐ जा ची वारी.!
पत्रकार नित्यानंद मोरे वाई शहर प्रतिनिधी

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

वाई नगरपरिषद हाल चाल रजिस्टरची पाने कोरी कर्मचाऱ्यांचा कारभार भारी मात्र नागरीकांची होतेय ऐ जा ची वारी.!

सातारा वाई.
दक्षिण काशी तिर्थक्षेत्र ओळखल्या जाणाऱ्या वाईचा डोलारा सांभाळणाऱ्या वाई नगरपालिकेच्या शिस्तचा पुर्णपणे बोजा वार उडाला आहे. कर्मचारी येण्या जाण्याच्या वेळा पाळत नसल्याचे धक्कादायक माहिती समोर आली आहे वाई नगरपरिषदेने हालचाल रजिस्टर ठेवले आहे मात्र त्याची पाने एखादी दुसरी नोंद दिसते नाही तर कोरीच पहायला मिळतात कर्मचारी अधिकारी कधी येतात कधी जातात याचं काही भान उरलेले नाही प्रत्येक कर्मचारी अधिकारी कामावर हजर झाल्यानंतर बाहेर ये जा करताना हालचाल रजिस्टर याचा वापर करणे गरजेचे आहे हालचाल रजिस्टर मध्ये संपूर्ण माहिती लिहने बंधनकारक आहे मात्र वाई नगरपरिषद कर्मचारी अधिकारी शासन निर्णय नियमांचे पालन करताना दिसत नाहीत परिणामी वाई नगरपरिषद येथे कामासाठी येणाऱ्या सर्व सामान्य नागरिकांना अधिकारी व बाहेर गेल्याचे सांगितले जाते अधिकार जागेवर नसतात. बाहेर जाताना येताना कसलीही नोंद हालचाल रजिस्टर मध्ये केली जात नाही याचा सर्व सामान्य नागरिकांना चांगलाच त्रास सहन करावा लागत आहे. तासंतास ताटकळत बसावे लागत आहे. मात्र कर्मचारी,अधिकारी बाहेर स्वतः च्या कामासाठी बिनधास्त फिरत असल्याच चित्र पहायला मिळते. शासनाच्या नियमांची पायमल्ली होताना वरोंवार दिसून येते अनेक कर्मचारी चहापाणी तसेच वैयक्तिक कामासाठी तासंतास बाहेर असतात त्यामुळे पालिकेत वेगवेगळ्या कामासाठी आलेल्या नागरिकांच्या फेऱ्याही वाढताना दिसत आहेत. बायोमेट्रिक हजेरी उपकरणे आहेत सकाळी येवून हजेरी लावायची मधल्या वेळत गायब राहायचे पुन्हा सुटीच्या वेळेस येवून हजेरी लावायची असे प्रकार ही होत आहेत अशा बेजबाबदार कर्मचारी अधिकारी वर्ग यांचेंवर मुख्याधिकारी साहेब शिस्तभंगाची कारवाई करणार का? मनमानी पद्धतीचा कर्मचाऱ्यांचा वाढलेला बेशिस्त कारभार यावर निवडून आलेले लोकनियुक्त नगराध्यक्ष.नगरसेवक यासाठी शासन निर्णय नियमांची अंमलबजावणी करतील का? याबाबत ही वाईकर नागरिक यांच्यात चर्चा रंगत आहे.कधीही या आणि कधीही जा! यामुळे वाईनगर पालिकेचा कारभार रामभरोसेच चालला आहे. यावर मा.मुख्याधिकारी संजीवनी दळवी मॅडम अशा बेजबाबदार अधिकारी, कामगारांवर शिस्त भंगाची कारवाई करून वाईकर नागरिक यांच्यापुढे एक आदर्श निर्माण करणार की नेहमी प्रमाणे सारवासारव करणार हे पुढील येणारा काळच सांगेल.




