मायणी:-३१मार्च व १एप्रिल २०२४ रोजी सद्गुरू सरुताई माऊलींचा मायणी येथे प्रकट दिन सोहळा.
उपसंपादक राष्ट्रीय संघटक (ORGANIZER) प्रा. दिलीप पुस्तके

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
उपसंपादक राष्ट्रीय संघटक (ORGANIZER) प्रा. दिलीप पुस्तके
RPS STAR NEWS
३१मार्च व १एप्रिल २०२४ रोजी सद्गुरू सरुताई माऊलींचा मायणी येथे प्रकट दिन सोहळा.
मायणी तालुका खटाव येथे रविवार दिनांक३१मार्च व सोमवार दिनांक १एप्रिल२०२४ रोजी श्री संत सद्गुरु मातोश्री सरुताई माऊली यांचा प्रकट दिन सोहळा संपन्न होणार आहे. अशी माहिती ट्रस्टतर्फे देण्यात आली. ३१मार्च २०२४ यादिवशी सरुताई लीला अमृत या ग्रंथाचे एक दिवसीय ग्रंथ वाचन सकाळी९वाजता होणार आहे. तरी ग्रंथ वाचकांनी आपली नावे मठामध्ये नोंद करावीत,असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच याचदिवशी रात्रौ ९वाजता सद्गुरु यशवंतबाबामहाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त एकनाथ षष्ठी कार्यक्रम चावडी चौकात होणार आहे.याचवेळी ह. भ.प. चंदाताई तिवाडी यांचे भारुड होणार आहे. ब्रह्मिभूत सद्गुरु यशवंतबाबामहाराज व संत सद्गुरु सरुताई माऊली यांच्या पुण्यतिथी सोहळ्यास गत वैभव प्राप्त व्हावे म्हणून सद्गुरु मातोश्री सरुताई ट्रस्ट व येळगावकर कुटुंबीय यांच्याकडून एकनाथ षष्ठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे,अशी माहिती ट्रस्टचे चेअरमन माजी आमदार डॉ.दिलीपराव येळगावकर यांनी दिली. सोमवार दिनांक१एप्रिल२०२४ हा प्रकट दिनाचा मुख्य दिवस आहे.यादिवशी पहाटे ५ वाजता माऊलींचा अभिषेक,सकाळी ६वाजता सद्गुरु यशवंतबाबा महाराज अभिषेक ,सकाळी७वाजता माऊलींची आरती,सकाळी९ते१२ सुश्राव्य भजन असे कार्यक्रम होणार आहेत.दुपारी बारा वाजता माजी आमदार डॉ.दिलीपराव येळगावकर व त्यांच्या सुविद्य पत्नी यांच्या शुभहस्ते माऊलींची महाआरती होणार आहे १२:३०वाजता आमदार जयकुमार गोरे यांच्या शुभ हस्ते व मा. खासदार रणजितसिंह नाईकनिंबाळकर तसेच धनंजय चव्हाण, संजीव साळुंखे,टी. आर. गारळे,अजय सानप,प्रकाश हांगे,विनोदराजे देशमुख,चंद्रकांत घाडगे,सुरेशअण्णा देशमुख यांच्या उपस्थितीत सरुताई लीलामृत ग्रंथाचे यु ट्यूबवर ऑनलाईन प्रकाशन होणार आहे. १२:३०नंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.या सर्व कार्यक्रमांचा लाभ भक्तांनी घ्यावा तसेच अन्नछत्र,गोशाळा व भक्तनिवास या नियोजित कामांसाठी भाविक भक्तांनी आर्थिक सहकार्य करावे अशी विनंतीही ट्रस्ट तर्फे करण्यात आली आहे.