आरोग्य व शिक्षणकृषी व व्यापारग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
जावळी:-उद्योगपती बापुराव कोंडिबा पार्टे (जाधव) उर्फ आप्पा यांचे निधन.
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा:-9922241299

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा
उद्योगपती बापुराव कोंडिबा पार्टे (जाधव) उर्फ आप्पा यांचे निधन.
सातारा दि:
जावली तालुक्यातील राजकारण, समाजकारण, उद्योग आणि सांप्रदायिक क्षेत्रातील ज्येष्ठ व्यक्तीमत्व व खर्शी बारामुरे गावचे सुपुत्र बापुराव कोंडिबा पार्टे (जाधव) उर्फ आप्पा यांचे वयाच्या ९५ व्या वर्षी वृध्दपकाळाने दुखद निधन झाले. त्यांच्यावर सातारा येथील संगम माहुली या ठिकाणी मंगळवार दिनांक २२ आँगस्ट२०२३ रोजी सकाळी ९ वाजता अंत्यसंस्कार होणार आहेत.
तत्पुर्वी सातारा शहरातील कृष्णानगर येथील शारदानंद या त्यांच्या निवासस्थानी त्यांचे पार्थिव अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे.त्यांच्या पाश्चात दोन विवाहीत मुले व तीन विवाहीत मुली, सुना, नातवंडे, असा मोठा परिवार आहे. जावली पंचायत समितीचे माजी उपसभापती हणमंत पार्टे व उद्योजक दिलिप पार्टे (जाधव) यांचे ते वडील होत. त्यांच्या निधनाची बातमी समजताच जावळी – सातारा तालुक्यावर शोककळा पसरली. अनेक मान्यवरांनी त्यांच्या निधनाबद्दल शोकही व्यक्त केला.
खर्शी बारामुरे ता.जावळी गावचे सुपुत्र असलेले बापुराव पार्टे (जाधव) हे आप्पा नावाने सुपरिचित होते, ग्रामीण भागात राहूनही अतंत्य प्रतिकुल परिस्थितीत त्यांनी जावळी तालुक्यासह जिल्हयातील राजकीय क्षेत्रात आपल्या कार्यकतृत्वाने स्वताचा वेगळा ठसा उमटवला होता, जावळी बँक, महू व
हातगेघर धरणासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले होते.
खर्शी बारामुरे गावचे माजी सरपंच, जावळी पंचायत समितीचे माजी उपसभापती, किसनवीर सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक व सातारा बाजार समितीचे माजी व्हा.चेअरमन असा विविध उच्चपदावर त्यांनी राजकीय प्रवास यशस्वीपणे पुर्ण केला होता, सातारा सारख्या जिल्हायाच्या ठिकाणी प्लँनेट उदयोग समुह, अलिशान फर्निचर, व जयभवानी स्टील अशा नामांकित उद्येाग व्यवसायाची त्यांनी उभारणी केली. ह. भ .प. दत्तात्रय महाराज कलंभे व भि दा भिलारे गुरुजी यांचे ते शिष्य होते.
———————–&–&—————-
फोटो -बापूराव पार्ट जाधव