कोरेगाव:-श्री गाडगे महाराज आश्रमशाळा ब्रह्मपुरी येथे नागपंचमीच्या औचीत्याने श्री गाडगे महाराज व्याख्यानमालेच्या निमित्ताने सर्पमित्र श्री.युवराज कणसे यांचे व्याख्यान.
पत्रकार आकाश जाधव खटाव तालुका उपाध्यक्ष:-7057706113

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार आकाश जाधव खटाव तालुका उपाध्यक्ष
श्री गाडगे महाराज आश्रमशाळा ब्रह्मपुरी येथे नागपंचमीच्या औचीत्याने श्री गाडगे महाराज व्याख्यानमालेच्या निमित्ताने सर्पमित्र श्री.युवराज कणसे यांचे व्याख्यान.
आमच्या आश्रमशाळेत नागपंचमी सणाचे औचित्य साधून अंगापूर येथील सर्पमित्र श्री.युवराज कणसे यांनी साप, सापाच्या विविध जाती , विषारी व बिनविषारी साप याविषयी प्रोजेक्टर च्या सहाय्याने माहिती सांगितली.
सापविषयी असणाऱ्या अंधश्रद्धा आणि विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे दिली आणि शंकांचे निवारण केले.सापाविषयी शास्त्रीय माहिती सांगताना साप हा आपला मित्र आहे त्यामुळे त्याला मारू नका, त्याला इजा करू नका, विनाकारण त्याला त्रास देवू नका असे सांगितले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापक सौ. भारती मोहिते मॅडम होत्या. त्यांनी आपले मनोगत व्यक्त करताना नागपंचमी सणाचे निसर्गाच्या व शेतकऱ्याच्या दृष्टीने महत्व सांगीतले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक श्री.दीपक माने सर यांनी केले.
यावेळी सर्व शिक्षक, अधिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी विद्यार्थीनी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री महेशकुमार बोभाटे यांनी केले आणि आभार श्री सूर्यकांत गेजगे यांनी मानले.