वाई:- श्रीमती धनश्री भोसले यांचे नेट परीक्षेत यश.
पत्रकार वैष्णवी शिंदे पुणे जिल्हा महिला PRR

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार वैष्णवी शिंदे पुणे जिल्हा महिला PRR
RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत )
वाई दि. 07
श्रीमती धनश्री भोसले यांचे नेट परीक्षेत यश.
वाई येथील जनता शिक्षण संस्थेच्या किसन वीर कनिष्ठ महाविद्यालयातील सहाय्यक शिक्षिका धनश्री भोसले यांनी यु.जी.सी.अंतर्गत घेण्यात आलेली नेट परीक्षा मराठी विषयामधून उत्तीर्ण होऊन यश संपादन केले आहे. त्याबद्दल त्यांचे जनता शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा. मदनदादा भोसले, उपाध्यक्ष श्री. शंकरराव गाढवे, सचिव प्रा. डाॅ. जयवंत चौधरी, खजिनदार प्रा. नारायण चौधरी, महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ. गुरुनाथ फगरे, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य श्री. बाळासाहेब कोकरे, पर्यवेक्षक श्री. अर्जुन जाधव व सर्व सहकारी शिक्षक वर्ग व शिक्षकेतर कर्मचारी यांनी त्यांचे अभिनंदन केले. धनश्री भोसले या बदेवाडी, भुईंज गावच्या रहिवाशी असून सर्व स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.बदेवाडी सारख्या ग्रामीण भागाची पार्श्वभूमी असलेल्या धनश्री भोसले यांनी कौटुंबिक जबाबदारी सांभाळून अभ्यासाचे शिवधनुष्य पेलले.त्यांनी आपल्या या यशाचे श्रेय जनता शिक्षण संस्थेचे सर्व पदाधिकारी व भक्कम पाठबळ देणारे आपले वडील आणि पती श्री. शंकर शिंदे यांना दिले.
RPS STAR NEWS YOUTUBE चॅनेल ला LIKE, FOLLOW, SUBSCRIBE आणि COMMENT करा.