फलटण:-आई प्रतिष्ठानचे कर्तृत्ववान महिला पुरस्कार जाहीर- जयश्री तांबे.
राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत )
आई प्रतिष्ठानचे कर्तृत्ववान महिला पुरस्कार जाहीर- जयश्री तांबे.
जागतिक महिला दिनानिमित्त व्याख्यान व राज्यस्तरीय कर्तृत्ववान महिला पुरस्कार वितरण सोहळा गुगल मिटद्वारे ऑनलाईन संपन्न झाला.
आई प्रतिष्ठान वाचन प्रेरणा समूह महाराष्ट्र राज्य आयोजित,जागतिक महिला दिनानिमित्त महिलांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना ” राज्यस्तरीय कर्तृत्वान महिला पुरस्कार” जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून ऑनलाईन द्वारे देण्यात आला आहे.
समाज हितासाठी कार्य करण्याची भक्ती आणि तुम्हाला सदैव प्रेरणा देणारे तुमची स्त्री शक्ती यांचा आम्ही आदरपूर्वक आणि सन्मानपूर्वक मानपत्र देऊन गौरव करीत आहे.
लाभे स्त्री शक्तीचे वरदान
दातृत्व कर्तृत्व महान
व्हावी जगी कीर्ती
तू नवशक्ती मांगल्यमूर्ती
या उक्तीप्रमाणे खालील महिला भगिनींना पुरस्कार देण्यात आले आहेत.
यामध्ये ,श्रद्धा रविराज पाटील-कराड ,शिलावती ज्ञानदेव पवार-.फलटण, स्वप्ना सत्यवान माळी- खंडाळा,स्वाती गणेश माने
-कोरेगाव,शारदा राहुल शिंदे- वाई,अश्विनी अनिल गुरव- सातारा,सीमा मारुती जाधव- कराड,भारती प्रवीण जाधव-
माण,नेहा प्रविण जाधव- जावली,रेश्मा शिवाजी बोडरे-खटाव,
रुपाली दत्तात्रय
इथापे-महाबळेश्वर,अंजना नंदकुमार चिरमे-फलटण,
इ.महिलांना मानपत्र देवून गौरव करण्यात आला अशी माहिती आई प्रतिष्ठान वाचन प्रेरणा समूह महाराष्ट्र राज्य अध्यक्षा सौ.जयश्री तांबे यांनी दिली आहे. २१व्या शतकाकडे वाटचाल करत असताना प्रत्येक क्षेत्रामध्ये महिला उत्कृष्ट अशा कार्य करत आहेत. अशा कार्याची दखल घेऊन त्यांचा उचित सन्मान केल्यानंतर त्यांना कार्य करण्याची प्रेरणा मिळते.आई प्रतिष्ठान वाठार निंबाळकर हे नेहमी नाविन्यपूर्ण उपक्रम राबवत असल्यामुळे जिल्ह्यातून अशा उपक्रमाचे कौतुक होत आहे. या कार्यक्रमांमध्ये विशेषता डॉ. रुचिका दुंदळे मॅडम यांनी महिलांचे आरोग्य या विषयी खूप छान सविस्तर व्याख्यान दिले. त्याचप्रमाणे ए.बी.पानसरे मॅडम, निर्भय पथक प्रमुख फलटण यांनी मुलींनी व महिलांनी कशी काळजी घ्यावी या विषयी छान असे मार्गदर्शन केले, पुरस्कार प्राप्त सौ.स्वाती माने मॅडम यांनी मनोगत व्यक्त केले.प्रास्ताविक रंजना सानप मॅडम यांनी केले, सूत्रसंचलन अनुपमा दाभाडे व अनिता जाधव मॅडम यांनी केले तर आभार मनीषा शिरटावले मॅडम यांनी मानले. या कार्यक्रमाला जिल्ह्यातून असंख्य महिलांनी सहभाग घेतला होता.
RPS STAR NEWS YOUTUBE चॅनेल ला LIKE, FOLLOW, SUBSCRIBE आणि COMMENT करा.