ताज्या घडामोडी

गंगापूर:-रायपूरकरांनी सहाय्यक कक्ष अधिकारी झालेल्या संजय देशमुखचा केला सत्कार..

पत्रकार ज्ञानेश्वर सोमासे गंगापूर 

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

 पत्रकार ज्ञानेश्वर सोमासे गंगापूर

RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत )

रायपूरकरांनी सहाय्यक कक्ष अधिकारी झालेल्या संजय देशमुखचा केला सत्कार..

दिनांक 4 मार्च 2025 रोजी सायंकाळी रायपूर तालुका गंगापूर या गावातील संजय साहेबराव देशमुख या तरुणाची नुकतीच सहाय्यक कक्ष अधिकारी उच्च न्यायालय छत्रपती संभाजी नगर या ठिकाणी नियुक्ती झाली आहे. ही बाब गावात समजताच गावकऱ्यांच्या वतीने डीजे लावून संजयची मिरवणूक काढण्यात आली. गावातील महिलांनी संजय चे औक्षण केले. यावेळी सत्कार समारंभाचा कार्यक्रम पांडुरंग मंदिरासमोर आयोजित करण्यात आला होता. यावेळी श्रंखला शशिकांत रत्नपारखी महिला पैलवान ही पोलीस झाल्याबद्दल तिचाही गावकऱ्यांच्या वतीने सन्मान करण्यात आला. सोबतच तेजस आनंद बाराहाते हा रायपूरचा तरुण ठाणे येथील उच्च न्यायालय मध्ये कनिष्ठ लिपिक झाला त्याचं देखील यावेळी सन्मान करण्यात आला.
प्रमुख मार्गदर्शक म्हणून माळीवाडगाव येथील श्री ज्ञानेश्वरजी वाघचौरे विचार मंचावर उपस्थित होते. छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता अहिल्याबाई होळकर,डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास सत्कारमूर्ती संजय देशमुख, यांच्या हस्ते पुष्प माला अर्पण करण्यात आली व त्यानंतर स्वागत समारंभाच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली. यावेळी बारहाते सर, ज्ञानेश्वर आहेर, कृष्णा कीर्तीकर, माजी सरपंच गणेश देशमुख यांनी मनोगत व्यक्त केले. प्रमुख मार्गदर्शनामध्ये श्री वाघचौरे यांनी रायपूर या गावचे कौतुक करून गावातील विविध प्रशासकीय पदावर असलेल्या तरुणांचे कौतुक केले. रायपूर गाव अलीकडे छान पद्धतीने मार्गक्रमण करत असून मोठ्या प्रमाणामध्ये तरुण- तरूणी प्रशासनामध्ये सहभागी होत असल्याचा आनंद त्यांनी यावेळी व्यक्त केला. आभार शशिकांत रत्नपारखी यांनी मानले. सूत्रसंचालन पोलीस पाटील बाबासाहेब जाधव यांनी केले.
यावेळी गावातील महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संतोष भाऊसाहेब देशमुख, गणेश उत्तम देशमुख, राजू साहेबराव देशमुख यांनी विशेष मेहनत घेतली.

RPS STAR NEWS YOUTUBE चॅनेल ला LIKE, FOLLOW, SUBSCRIBE आणि COMMENT करा. 

ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button