सातारा:-पुणे विभागस्तरीय सर्व धर्मीय बैठक शुक्रवारी- बैठकीस उपस्थित राहण्याचे आवाहन.
पत्रकार श्रीनिवास पवार सातारा जिल्हा संघटक

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार श्रीनिवास पवार सातारा जिल्हा संघटक
RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत )
पुणे विभागस्तरीय सर्व धर्मीय बैठक शुक्रवारी-
बैठकीस उपस्थित राहण्याचे आवाहन.
सातारा दि. 6: पुणे विभागातील अल्पसंख्य व सर्वधर्म समभाव रूजविणे, वसुधैव कुटुंबकम ही भावना निर्माण करून अल्पसंख्याकांवर होणारे हल्ले याला आळा घालण्यासाठी उपाययोजना सूचविणे या विषयी चर्चा करून अल्पसंख्याक समुदायावरील हल्ले तसेच नोंद होत असलेले व्देषगुन्हे (Hate Crime) यांना आळा घालण्यासाठी उपाययोजना करण्यासाठी पुणे विभागस्तरावर सर्वधर्मिय बैठक शुक्रवार 7 मार्च रोजी सकाळी 11 वाजता आयोजित केली आहे.
या बैठकीसाठी सातारा जिल्ह्यातील संबंधित शासकीय अधिकारी, अल्पसंख्यांकांचे प्रतिनिधी, इतर सर्व धर्मियांचे प्रतिनिधी, स्वयंसेवी संस्था, विविध धर्मियांचे धार्मिक व्यक्ती (संत, पुजारी, मौलाना, मौलवी, फादर इ.) शिक्षण तज्ञ यांनी सदर बैठकीसाठी कॉन्फरन्स हॉल, महिला मजला, नवीन प्रशासकीय इमारत, जिल्हाधिकारी कार्यालय, सातारा येथे उपस्थितीत, असे आवाहन जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी केले आहे.
RPS STAR NEWS YOUTUBE चॅनेल ला LIKE, FOLLOW, SUBSCRIBE आणि COMMENT करा.