रा.कुर्ले:-(खटाव)-30 वर्षाची देश सेवा पूर्ण केल्याबद्दल सुभेदार राजेंद्र बापू माने यांचा सत्कार.
पत्रकार सौरभ चव्हाण सातारा जिल्हा कार्याध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार सौरभ चव्हाण सातारा जिल्हा कार्याध्यक्ष
RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत )
30 वर्षाची देश सेवा पूर्ण केल्याबद्दल सुभेदार राजेंद्र बापू माने यांचा सत्कार.
राजाचे कुर्ले ता.खटाव जि. सातारा गावचे सुपुत्र सुभेदार राजेंद्र बापू माने यांनी आपली 30 वर्षाची देश सेवा पूर्ण करून आपल्या जन्मभूमीत परतले त्यावेळी राजाचे कुर्ले गावचे ग्रामस्थ,आजी-माजी सरपंच,उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य,विकास सेवा सोसायटी चेरमन,व्हा.चेरमन, सदस्य ,राजाचे कुर्ले गावची आजी-माजी सैनिक संघटना,सर्व माने परिवार,नातेवाइक, SSC बॅच 1992,सर्व शिक्षक वृंद,श्रीमंत शिव गणेश नवरात्र उत्सव मंडळ सदस्य,श्री जानुबाई गणेश मंडळ सदस्य,फ्रेंड्स ग्रुप व गावातील प्रतिष्ठित मंडळी यांच्या उपस्थितीत राजाचे कुर्ले या गावं कमानीत त्यांचे स्वागत करण्यात आले.या कार्यक्रमास वर्धन ऍग्रोचे संचालक विक्रम बाबा कदम,व स्वाभिमानी सखीमंच च्या अध्यक्षा सौ.समताताई मनोज घोरपडे व इतर मान्यवर उपस्थित होते. 30 वर्ष देश सेवा पूर्ण केल्याबद्दल त्यांचे कौतुक करण्यात आले. आजी-माजी संघटना सातारा जिल्हा अध्यक्ष प्रशांत कदम व रॉयल कारभार ग्रुप चे महाराष्ट्र संपर्क प्रमुख सुरज पाटोळे यांनी ही शुभेच्छा दिल्या.ज्या मातील जन्मलो,लहानाचे मोठे होत अभ्यास पासून, मज्जा-मस्ती,भांडणे केली त्या सर्वांना उजाळा देत व आपल्या आयुष्यातील 30 वर्ष देश सेवेसाठी देत असताना आलेला प्रत्येक अनुभव सांगताना सुभेदार माने यांच्या भावना अनावर झाल्या.तसेच पत्नी,मोठे बंधू-वहिनी,बहिणी व वर्गीय आई-वडील,मावशी यांची मिळालेली साथ याची आवर्जून आठवण करून देत सर्वांचे आभार सुभेदार माने यांनी मांडले तसेच भोजनाचा आस्वाद घेत कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.