खुपटा ते जळकीबाजार रस्ता बनला खड्डेमय अधिकार्यांचे दुर्लक्ष
प्रतिनिधि:- गजानन काळे औरंगाबाद

*खुपटा ते जळकीबाजार रस्ता बनला खड्डेमय अधिकार्यांचे दुर्लक्ष*
सिल्लोड तालुकयातील जि.प.अंतर्गत येणारा जळकीफाटा ते खुपटा जळकीबाजार या रस्त्याचे उद्घाटन माननीय राज्य मंत्री अब्दुल सत्तार साहेब यांच्या हस्ते झाले होते. उद्घाटन होऊन तब्बल दहा महिने होवून सुद्धा अद्याप कामाला सुरुवात नाही. या रस्त्याची चाळण झाली आहे. रस्तावर पडलेल्या खडयामुळे वाहनधारक त्रस्त झाले असुन मानसिक त्रास सहन करावा लागत आहे.या मार्गावरुण जाताना जागोजागी पडलेले खड्डे चुकविताना वाहनधारकाना मोठी कसरत करावी लागत आहे. या रस्त्यावरुन जाणारे वाहनाचे अपघात सुद्धा झाले आहेत. तरीपण अधिकारी रस्त्याकडे दुर्लक्ष करीत आहेत. महत्वाचे म्हणजे या गावाला लागून दोन मोठया बाजारपेठ आहेत. शिवना व पिंपळगाव जाण्या येण्यासाठी हाच मुख्य रस्ता आहे. तरी येथील नागीरक रोज कामनिमित्त शिवना व पिंपळगाव येथे जावे यावे लागत होते. तरीही जळकीफाटा ते जळकीबाजार या रस्त्याला पाणंद रस्त्यांचे स्वरुप आले असुन पावसाळ्यापूर्वी या रस्त्याचे काम पूर्ण होणे अपोक्षित आहे मात्र कंत्राटदार व संबधित अधिकारी यात वेळकाढूपणा करीत आहेत. लवकरात लवकर या रस्त्याचे काम चालू करण्यात यावे अशी मागणी नागरिकांतून होत आहे.