कोल्हापूर:- प्रभाग क्रमांक 15 कनान नगर येथे मा. नगरसेवक दिलीप पोवार यांचा वाढदिवस उत्साहात संपन्न.
पत्रकार विक्रम सावंत कोल्हापूर जिल्हाध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार विक्रम सावंत कोल्हापूर जिल्हाध्यक्ष
RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत )
कोल्हापूर:- प्रभाग क्रमांक 15 कनान नगर येथे मा. नगरसेवक दिलीप पोवार यांचा वाढदिवस उत्साहात संपन्न.
कोल्हापूर शहरातील प्रभाग क्रमांक १५ कनान नगर भागातील मा.नगरसेवक श्री.दिलीप हणमंतराव पोवार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात आज जिल्ह्य़ातील मातब्बर नेत्यांच्या उपस्थितीत वेगवेगळे उपक्रम पार पाडण्यात आले.
यावेळी मा.चंद्रकांत दादा पाटील (उच्च तंत्र शिक्षण मंत्री व कॅबिनेट महाराष्ट्र राज्य) काही कारणास्तव उपस्थित राहू शकले नाहीत.मा.श्री.धनंजय ऊर्फ मुन्नासाहेब महाडिक (राज्यसभा खासदार), मा.श्री. योगेश जाधव (संपादक दै. पुढारी), मा.श्री.आर.के. पोवार, मा.श्री.विजयराव जाधव, मा.श्री.महेश जाधव, मा.श्री.अतुल संजय चव्हाण तसेच शहरातील अन्य पदाधिकाऱ्यांसह मित्र मंडळी आणि भागातील नागरिक मोठ्या संख्येत उपस्थित होते.
कार्यक्रमातील उपक्रमांतर्गत गरीब व गरजू महिलांना चांगल्या प्रतीच्या साड्या वाटप, वृक्षारोपण, तसेच ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार समारोह उत्साहात पार पडला.