शेणे (ता. वाळवा) येथे आमदार मानसिंगराव नाईक यांचे 25/15 या योजनेतून 10 लाख रुपये किंमतीचा रस्त्याचे उद्घाटन सोहळा संपन्न.
प्रतिनिधी:-विनोद पाटील कराड:-976 2274165

शेणे (ता. वाळवा) येथे आमदार मानसिंगराव नाईक यांचे 25/15 या योजनेतून 10 लाख रुपये किंमतीचा रस्त्याचे उद्घाटन सोहळा संपन्न
शेणे (ता. वाळवा) येथे आमदार मानसिंगराव नाईक यांनी 25/15 या योजनेतून 10 लाख रुपये किंमतीचा प्रभाग दोन मधील रस्त्याचे उद्घाटन सांगली जिल्हा युवक राष्ट्रवादीचे अध्यक्ष विराज नाईक यांच्या हस्ते झाले. सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवराज पाटील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी जिल्हाध्यक्ष नाईक यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास सोसायटीचे अध्यक्ष संजय पाटील, डॉ. महेश पाटील, शंकर पवार, विजय मदने, सोसायटीचे माजी अध्यक्ष बाळासो पाटील, दीपक पाटील, अधिकराव पाटील, बजरंग पाटील, नेताजी पाटील, रघुनाथ पाटील, सरपंच विनायक निकम, उपसरपंच वर्षाराणी पाटील, तंटामुक्तीचे अध्यक्ष रामभाऊ पाटील, माजी उपसरपंच एस. आर. पाटील, संभाजी पाटील, रंगराव पाटील, नाथाजी पाटील यांच्यासह राष्ट्रवादीचे सर्व प्रमुख पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.