श्रीरामपूर:-शिवजयंतीनिमित्त श्रीरामपुर ते शिवनेरी सायकल वारी……
पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुका अध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुका अध्यक्ष
RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रस्ताव मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत )
शिवजयंतीनिमित्त श्रीरामपुर ते शिवनेरी सायकल वारी……
माळेवाडी ( प्रतिनिधी ) छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त श्रीरामपूर ते शिवनेरी सायकलिंग वारीचे आयोजन श्रीरामपूर सायकलिंग क्लब च्या वतीने करण्यात आले होते.
या वारीमध्ये जवळपास २५ सायकल स्वारांनी सहभाग नोंदविला .या शिवनेरी वारीचे हे पहिलेच वर्ष होते . श्रीरामपुर ते शिवनेरी असे १५० किमी अंतर चालण्यासाठी सायकल स्वार येथील शिव स्मारकपासून पहाटे ५ वाजता मार्गस्थ झाले.श्रीरामपुर म्हैसगाव, साकुर,मांडले पारगाव, आळेफाटा, ओतून बनकर फाटा असे दिवसामध्ये तब्बल १५० किलो मीटर अंतर ८ ते ९ तासांमध्ये पुर्ण केले. छत्रपती शिवाजी महाराज यांचा जीवनपट आपल्यासाठी प्रेरणादायी आहे. त्यांच्या शौर्याच्या आणि धाडसाच्या कहाण्या आजही आपल्या मनात आणि मनगटात जोश भरतात. त्यांनी स्वराज्याची स्थापना करून न्याय . धर्म आणि स्वातंत्र्याच्या तत्वांचा आदर्श ठेवला . त्यांच्या प्रेरणादायी कर्तृत्वाचा आदर्श ठेवून आपण आपल्या प्रामाणिकपणा,धैर्य आणि विशाल कोटक, सचिन भांड, अभिमन्यू मांडण,रावसाहेब साठे, डॉ रवींद्र भिटे, श्रीकांत दहिमीवाल,नितीन देशमुख, अण्णासाहेब पाचपिंड, रोहित राऊत,सुधीर कोहली, तान्हाजी पाटील, संतोष दांडगे, संतोष वाकळे, ज्ञानदेव चौधरी, डॉ रवींद्र महाडिक, रंगनाथ माने, अरुण शिंदे, आदिनाथ पाचपिंड आचुत औताडे सर्व मान्यवर उपस्थित होते.