कृषी व व्यापारग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

खटाव:-पेडगाव येथे विक्रमी बैलगाडी शर्यतीने आखाडा गाजला.

ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा:-9922241299

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

 ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

पेडगाव येथे विक्रमी बैलगाडी शर्यतीने आखाडा गाजला.

वडूज दि: ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सर्वत्र बैलगाडी शर्यती भरविल्या जातात.परंतु, यंदाच्या वर्षी पेडगाव ता.खटाव येथील भव्य दिव्य बैलगाडा शर्यत २०२३ च्या विक्रमी आखाड्याने सर्वांच्या डोळ्यांची पारणे फिटले आहेत. सामाजिक कार्यकर्ते शैलेश जाधव यांच्या नेतृत्वाखाली हा आखाडा गाजला आहे.
महाराष्ट्रातील एक नंबरचा बैलगाडी शर्यत आखाडा पाहून शौकीन जाम खुश झालेले पहाण्यास मिळाले.दि २१ जुलै रोजी पेडगाव माळरानात चक्क बैलगाडी शर्यती भरविल्या गेल्याने खऱ्या अर्थाने मराठी बाणा दाखवत जमलेल्या शौकीन लोकांनी मनमुराद आनंद लुटला. या आखाड्याचे आयोजन सामाजिक कार्यकर्ते श्री.शैलेश बाबा जाधव यांनी केली होते
एकूणच ९२ बैलगाड्या गट पळाले. ९० गटाचा विक्रम प्रस्थापित झाला होता.तो मोडण्यात यश संपादन केले आहे. कोरेगाव भाजपचे आ. श्री महेश दादा शिंदे , डॉ. भैयासाहेब बंडगर टायगर ग्रुप राष्ट्रीय उपाध्यक्ष यांचे या बैलगाडी शर्यतीला मोलाचे सहकार्य लाभले होते.

बैलगाडी क्षेत्रातील सर्व नामवंत मालक चालक यांनी आपले कौशल्य पणाला लावून शर्यतीत भाग घेतला होता. यापेक्षाही मोठ्या उत्साहाने पुढील वर्षी आखाडा घ्यावा .अशी विनंती सर्व बैलगाडा मालक चालक यांच्या कडून करण्यात आली आहे. त्याची ही आतापासूनच तयारी सुरू झाली आहे. या बैलगाडी शर्यती भरविल्या गेल्यानंतर पेडगाव पंचक्रोशीतील ग्रामस्थ, प्रशासकीय यंत्रणा, पोलीस ठाण्यातील सर्व पोलिसांचे मनपूर्वक आभार मानले गेले. अत्यंत शांततेने आखाडा गाजला आहे. यावेळी विजेत्या स्पर्धकांना ढोल ताशांच्या गजरात बक्षिस वितरण करण्यात आले.त्यानंतर मिरवणूक काढण्यात आली.
————————&&&——————————- फोटो – पेडगाव ता. खटाव येथील बैलगाडी आखाडा व विजेता,, बक्षिस वितरण करताना (छाया- अजित जगताप सातारा)

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button