आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीमहाराष्ट्र

महाबळेश्वर:-पाचगणी येथील रिसॉर्टवर सातारा पोलिसांची डॉक्टरवर कायद्याची शस्त्रक्रिया……..

ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

 ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

पाचगणी येथील रिसॉर्टवर सातारा पोलिसांची डॉक्टरवर कायद्याची शस्त्रक्रिया……..

 

सातारा दि १३ ( प्रतिनिधी )
सातारा जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण असलेल्या पाचगणी परिसरातील कासवंड या छोटेखानी गावात स्प्रिंग रिसॉर्ट येथे डान्सबार सातारा पोलिसांनी छापा टाकून डॉक्टरांवरच कायद्याची शस्त्रक्रिया केली आहे. या रिसॉर्टवर सातारा पोलिसांनी छापा टाकून सातारा जिल्ह्यातील पाच, मिरज येथील एक व पुण्याचा एक अशा सात डॉक्टरांना ताब्यात घेतले . या प्रकरणी संबंध युवतींनाही ताब्यात घेण्यात आले आहे .

डॉक्टर मनोज विलास सावंत रा. दहिवडी, डॉक्टर राहुल बबनराव वाघमोडे रा. दहिवडी, डॉक्टर निलेश नारायण सन्मुख रा. मिरज, डॉक्टर रणजीत तात्या सुकाळे रा. दहिवडी, डॉक्टर महेश बाजीराव साळुंखे रा .मलकापूर कराड, डॉक्टर खाडे रा.सातारा व डॉक्टर प्रवीण शांताराम सैद रा. पुणे अशी संबंधित डॉक्टरांची नावे असून पोलीस यंत्रणे मात्र या डॉक्टरांची नावे प्रसिद्धीला देण्यास असमर्थता दर्शवली आहे.
वास्तविक पाहता सातारा पोलीस हे कुठल्याही गुन्हेगाराच्या पाठीशी उभे राहत नाहीत. अनेकदा गुन्हेगारांची नावे प्रसिद्धीला देऊन त्यांचे कार्यकर्ते जनतेसमोर आणतात. पण या घटनेबाबत पोलिसांवरच दबाव असल्याचे चित्र दिसून येत आहे.

पाचगणी परिसरातील कासवंड गावातील स्प्रिंग रिसॉर्ट नावाच्या ठिकाणी हॉटेलमधील एका हॉलमध्ये सांगली व पुणे येथून काही नर्तिका आणण्यात आल्या असून त्या संबंधित गिऱ्हाईकांसमोर अत्यंत कमी कपड्यात अंगविक्षेप करत नाचत असल्याची माहिती अतिरिक्त पोलिस अधीक्षक आचल दलाल यांना मिळाली. त्यावरून सातारा पोलिसांचे विशेष पथक कासवंड येथे रवाना झाले. घटनास्थळी पोहोचताच रात्री साडेनऊच्या सुमारास स्प्रिंग रिसॉर्टच्या तळमजल्यात पोलिसांनी छापा मारला असता सात जण डॉक्टर दारूच्या नशेत नर्तिकांच्या समोर झिंगत असल्याचे आढळून आले . या डॉक्टरांना पोलिसांनी पकडल्यानंतर एकच पळापळ सुरू झाली .सुमारे अर्धा ते पाऊण तास हे कारवाई सुरू होती या धडक कारवाईमुळे सातारा जिल्ह्याच्या वैद्यकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे या प्रकरणी संबंधित चार महिलांना सुद्धा ताब्यात घेण्यात आले आहे हा रिसॉर्ट शिर्के नावाच्या एका व्यक्तीचा आहे त्यामुळे ताब्यात घेण्यात आलेल्यांची संख्या आठ झाली असून त्यांच्या विरोधात कारवाई करण्यात आली आहे . पाचगणी पोलिसांमध्ये रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू होती

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button