श्रीरामपूर:-आंतरशालेय साने गुरुजी संस्कार परीक्षेत अराबेया शेख व आरोही विखे यांचे यश ….
पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुका अध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुका अध्यक्ष
RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत )
आंतरशालेय साने गुरुजी संस्कार परीक्षेत अराबेया शेख व आरोही विखे यांचे यश ….
श्रीरामपुर ( प्रतिनिधी ) अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला मुंबई आयोजित श्यामची आई या संस्कारक्षम आत्मकथनपर पुस्तकावर आधरित संस्कार परीक्षा नुकतीत जिल्हा परिषद सेमी इंग्लिश स्कूल मानेवाडी येथे दोन गटात येण्यात आली या स्पर्धेत मोठ्या गटात प्रथम क्रमांक अरबिया तायर शेख तर आराधना निलेश रोठे आणि आराध्या किशोर पवार द्वितीय क्रमांक विभागून तर सोहम भरत वमने आणि ईश्वरी मनोज घोडके यांना तृतीय क्रमांक विभागून देण्यात आला लहान गटात प्रथम क्रमांक आरोही संतोष विखे, द्वितीय क्रमांक योगेश्वरी प्रवीन गाडेकर, आराध्या संतोष हाडके, दिव्यांका राहुल औताडे यांना विभातून तर तृतीय क्रमांक धनश्री गणेश आसने, यांनी पटकावला, परीक्षेसाठी साठ विद्यार्थी बसले होते. सर्वांना श्यामची आई हे पुस्तक वाचण्यासाठी देण्यात आले होते प्रथम विजयी स्पर्धकांना सन्मानचिन्ह . प्रमाणपत्र आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले सदरील कार्यक्रमांला सरपंच,उपसरपंच सर्व ग्रामपंचायत सदस्य चेअरमन,व्हाईस चेअरमन सर्व संचालक, तंटामुक्ती अध्यक्ष शाळा व्यवस्थापनसमिती अध्यक्ष उपाध्यक्ष आणि ग्रामस्थ मोठ्या संख्याने उपस्थित होते यशस्वीतेसाठी मुख्या ध्यापक राजु भालेराव, परीक्षा प्रमुख रज्जाक शेख, मीरा ससाने, सारिका लोखंडे,मीनाक्षी जाधव, तेजश्री जाधव यांचे मार्गदर्शन लाभले.