ताज्या घडामोडी
कराड:-पार्ले गावातील महिलेने ऊस तोडी कामगार महिलांबरोबर साजरा केला वाणवाटप हळदी कुंकू कार्यक्रम.
पत्रकार विनोद पाटील सातारा जिल्हा अध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार विनोद पाटील सातारा जिल्हा अध्यक्ष
RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत )
पार्ले गावातील महिलेने ऊस तोडी कामगार महिलांबरोबर साजरा केला वाणवाटप हळदी कुंकू कार्यक्रम.
कराड- कराड तालुक्यातील पार्ले गावातील सौ. रेश्मा सुरेश पाटील यांनी आदर्श हळदीकुंकू कार्यक्रम साजरा केला. मकरसंक्रातीच्या निमित्ताने
घराघरात हळदीकुंक साजरे करतात त्याचबरोबर आता तर सार्वजनिक स्तरावरही हळदीकुंकवाचे कार्यक्रम केले जातात. मकरसंक्रांतपासून रथसप्तमीपर्यंत हळदी-कुंकू केले जाते. या निमित्ताने जवळच्या मैत्रिणी आणि सुवासिनींना घरी वाण देण्या-घेण्यासाठी बोलावता येतं.
परंतु पार्ले गावातील महिलेने ऊस तोडी कामगार महिलांना वाण वाटप करून एक वेगळा संदेश समाजात दिला. याबद्दल त्यांचे कौतुक होत आहे.