वाई:- किसन वीर च्या स्वयंसेवकांनी बांधला वनराई बंधारा – – धावडीतील स्मशानभूमीचीही केली स्वच्छता.
पत्रकार वैष्णवी शिंदे पुणे जिल्हा महिला PRR

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार वैष्णवी शिंदे पुणे जिल्हा महिला PRR
RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत )
वाई दि.01 किसन वीर च्या स्वयंसेवकांनी बांधला वनराई बंधारा – – धावडीतील स्मशानभूमीचीही केली स्वच्छता.
वाई,
येथील जनता शिक्षण संस्थेच्या किसन वीर महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष श्रमसंस्कार शिबिर मौजे धावडी ता. वाई येथे नुकतेच संपन्न झाले. या श्रमसंस्कार शिबिराच्या माध्यमातून सर्व युवक, ग्रामस्थ व स्वयंसेवक यांच्या श्रमदानातून कोल्हापूर पद्धतीचा वनराई बंधारा, स्मशानभूमी स्वच्छता, ग्रामदैवत भैरवनाथ मंदिराची स्वच्छता, ग्रामस्वच्छता, चावडी स्वच्छता, जि.प.प्राथमिक शाळा परिसर स्वच्छता, मुरूम पसरविणे व मुख्य चौकात प्रभात फेरी इत्यादी कामे करण्यात आली. संस्था अध्यक्ष मदनदादा भोसले यांचे पाठबळ, प्राचार्य डॉ. गुरुनाथ फगरे, सल्लागार प्रा. डॉ. चंद्रकांत कांबळे व ग्रामस्थमंडळ धावडी यांचे मार्गदर्शन यांच्या सहकार्यामुळे शिबिर यशस्वी झाले. याप्रसंगी विलास मांढरे, महेंद्र ननावरे, कॅप्टन डॉ समीर पवार, कार्यक्रम अधिकारी डॉ. संग्राम थोरात, डॉ. अंबादास सकट, प्रतिक्षा मांढरे, नीलम भोसले, मनीषा शेवाळे, रेखा भोसले यांची उपस्थिती होती.
शिबिर चालू असताना ग्रामस्थ विलास मांढरे यांनी गावाच्या ओढ्यावर कोल्हापूर पद्धतीचा वनराई बंधारा बांधण्याचा मानस बोलून दाखविला, त्यांच्या मते गावात कितीही स्वच्छता केली तरी, पुन्हा कचरा होणारच आहे, त्यापेक्षा पाणीपुरवठ्याच्या विहिरीलगत बंधारा बांधून गावाच्या लक्षात राहील असे काम करा. म्हणजे विहिरीला पाणी वाढेल. या मताला प्रतिसाद देत कार्यक्रम अधिकारी डॉ. संग्राम थोरात यांनी शिबिरार्थींना ग्रामस्थांच्या मनातील भावना बोलून दाखवली व वनराई बंधारा बांधण्याचे आवाहन केले, त्यास सर्व स्वयंसेवकांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. व त्यातून मोठे विधायक काम घडले.
मग काय तरूणाई कामाला लागली. संस्कार, विक्रम, सुमित, दिग्विजय, चिंतामणी, रितेश, आर्यन, रोहन, यश, विशाल या स्वयंसेवकांनी पुढाकर घेऊन गावातून सिमेंटच्या रिकाम्या गोण्या गोळा केल्या. हातात टिकाव, खोरी, घमेली घेऊन स्वयंसेवक सज्ज झाले. पण बंधारा बांधण्याचा अनुभव कुणालाच नव्हता. त्यावेळी ग्रामस्थ विलास मांढरे मदतीला धावून आले. सलग चार तास उन्हात उभा राहून त्यांनी आपल्या अनुभवाच्या जोरावर तरूणाईला मार्गदर्शन केले. त्यात मुलींनीही भाग घेऊन मुरूम पोत्यात भरण्याचे काम केले, आणि आपणही मुलांच्या खांद्याला खांदा लावून काम करू शकतो हे त्यांनी कामातून दाखऊन दिले. या कामानंतर धावडीतील स्मशानभूमीचीही स्वयंसेवकांनी स्वच्छता केली. सरपंच वनिता ननावरे यांनी या विधायक कामाबद्धल समाधान व्यक्त केले.
हे काम पाहून उपसरपंच अनिल मांढरे म्हणाले, शिबिरातील एन. एस. एस. च्या स्वयंसेवकांनी गावाच्या मुख्य पाणीपुरवठ्याच्या विहिरीलगत कोल्हापूर पद्धतीचा बंधारा बांधल्याने आमच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे. अगदी उन्हाळ्यापर्यंत विहिरीला पाणी वाढत राहणार आहे, व दररोज पाणी पिताना आम्हाला स्वयंसेवकांची नक्की आठवण येत राहील. प्रा. डॉ. ज्ञानदेव झांबरे म्हणाले, तरूणाईच्या शक्तीला जर योग्य वळण दिले, तर अशी कामे होऊ शकतात. या कामातून श्रमसंस्कार शिबिराचा उद्देश सफल झाला. आपल्या कॉलेजला फेब्रुवारी महिन्यात नँक समिती भेट देणार आहे. त्यावेळी गावाला भेट देण्याचा नक्की प्रयत्न करू अशी त्यांनी ग्वाही दिली.
शिबिराच्या यशस्वीतेसाठी डॉ.राजेश गावित, सुमंत सावंत, विशाल महांगडे, जितेंद्र चव्हाण, डॉ.संदीप वाटेगावकर, कांचन मोरे, सुमती कांबळे, सोमिनाथ सानप , मेघा शिर्के, दीक्षा मोरे, डॉ.मृणालिनी वाईकर यांनी परिश्रम घेतले.