वैजापूर:-चेक बाऊन्स प्रकरणी सहा महिने कारावास.
पत्रकार बाळासाहेब सरोदे मराठवाडा संघटक

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार बाळासाहेब सरोदे मराठवाडा संघटक
RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत )
चेक बाऊन्स प्रकरणी सहा महिने कारावास.
लोकविकास नागरी सह पतसंस्था म. वैजापूर
येथील लोकविकास नागरी सहकारी पतसंस्थेच्या कर्ज रकमेच्या परतफेडीपोटी दिलेला धनादेश न वटल्याने एकास सहा महिने सश्रम कारावास व नुकसान भरपाईपोटी दिड लाख रुपये भरण्याचे आदेश वैजापूर येथील प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी डी.एस. पिसाळ यांनी गुरुवारी (३० जानेवारी) दिले. नुकसान भरपाई न दिल्यास आणखी एक महिना सश्रम कारावासाची शिक्षा भोगण्याचे आदेश न्यायालयाने आरोपीला दिले आहेत. सुनिल तुळशीराम मतसागर (वय ३४, राहणार जानेफळ, तालुका वैजापूर) असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे.
या प्रकरणाची अधिक माहिती अशी कि तालुक्यातील जानेफळ येथील रहिवासी सुनिल मतसागर याने लोकविकास नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, वैजापूर यांच्याकडुन कर्ज घेतले होते. परंतु कर्जाची रक्कम मुदतीत न भरल्याने मतसागर थकबाकीदार झाला. म्हणुन पतसंस्थेने थकबाकीची रक्कम मागितल्याने मतसागर याने कर्ज परतफेडपोटी ३१ ऑगस्ट २०१९ रोजी पतसंस्थेला भारतीय स्टेट बॅक, शाखा वैजापुरचा एक लाख १९ हजार ६०० रुपयांचा धनादेश पतसंस्थेला दिला. याप्रकरणात लोकविकास पतसंस्थेतर्फे फिर्यादी असलेले शशिकांत विष्णु निकाळे (राहणार वैजापूर) यांनी परतफेडीपोटी दिलेला धनादेश त्यांच्या (पतसंस्थेच्या) खात्यात जमा केला. परंतु खात्यात अपुरी रक्कम असल्याच्या कारणास्तव हा धनादेश अनादरीत झाला. धनादेश न वटल्याने पतसंस्थेने सुनिल मतसागर यास विधिज्ञ एस.एस. मगर यांच्यामार्फत नोटिस बजावली. मात्र या नोटिसीला प्रतिसाद न मिळाल्याने सुनिल मतसागर याच्याविरुद्ध पराक्रम्य संलेख १८८१ च्या कलम १३८ नुसार येथील न्यायालयात फौजदारी खटला दाखल करण्यात आला.
याप्रकरणात २५ जानेवारी २०२३ रोजी आरोपींविरुद्ध दोषारोप ठेवण्यात आला व २४ मार्चपासुन पुरावा सुरु झाला. पतसंस्थेतर्फे शशिकांत निकाळे यांनी दाखल केलेल्या साक्ष शपथपत्रात सर्व बाबी विस्ताराने पुराव्यात स्पष्ट केल्या. आरोपी सुनिल मतसागर याने हे साक्ष शपथपत्र आव्हानित केले नाही. निकाळे यांनी दाखल केलेले धनादेश, बॅंक मेमो, नोटिस मिळाल्याची पोचपावती व अन्य कागदपत्रे हे कायद्यानुसार प्राथमिक सिद्धतेचे गृहतिक असुन हे गृहतिक खोडुन काढण्यास आरोपी असमर्थ ठरल्याचे सिद्ध झाले. तसेच संपुर्ण खटल्याच्या सुनावणीच्या वेळी फिर्यादी निकाळे यांनी एस एस मगर वकिलामार्फत अभिलेखावर हजर असतांना मागील दोन वर्षांच्या काळात आरोपी गैरहजर राहिला.
याप्रकरणात न्यायालयाने आरोपी सुनिल मतसागर यास दोषी ठरवुन सहा महिने सश्रम कारावास व दिड लाख रुपये नुकसान भरपाई व भरपाई न दिल्यास आणखी एक महिना कारावास भोगण्याचे आदेश दिले तसेच आरोपीचा जातमुचलका रद्द करण्याचे आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी डी.एस.पिसाळ यांनी दिले आहेत.