आरोग्य व शिक्षणग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

फलटण:-नारी शक्ती देशाचा भक्कम आधारस्तंभ आहे. – सौ.जयश्री तांबे.

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

नारी शक्ती देशाचा भक्कम आधारस्तंभ आहे. – सौ.जयश्री तांबे.

 

आपल्या हिंदू संस्कृती मध्ये ‘स्ञी ‘ ही कुटुंबाचा भक्कम कणा आहे.आपल्या बुद्धीमत्तेने,कार्यकर्तृत्वाने आजची साविञीची लेक आपला आणि देशाचाही गौरव वाढवित आहे.
राजमाता जिजाऊ, क्रांतीज्योती सावित्रीमाई,पुण्यश्लोक अहिल्यादेवी,झाशीची राणी लक्ष्मीबाई, माता रमाई. या थोर कर्तबगार महिलांचा वारसा आपणाला लाभला आहे.
राजकारण,समाजकारण. क्रीडा, संशोधन ऊद्योग…यासारख्या अनेक क्षेञामध्ये आपले श्रेष्ठत्व आणि नैपुण्य महिलांनी सिद्ध केलेले आहे.
त्यामुळेच आज नवराञौत्सवाच्या निमित्ताने ‘स्ञी ‘ च्या शक्तीचा,कलेचा, प्रतिभेचा,कर्तृत्वाचा, मातृत्वाचा,दातृत्वाचा,
त्यागाचा,समर्पणाचा,
आणि तिच्या कष्टाचा गौरव म्हणून आई प्रतिष्ठान वाठार निंबाळकर संस्थेच्या वतीने नवरात्र उत्सव कालावधीमध्ये *नवदुर्गा पुरस्कार* देऊन प्रतिनिधिक स्वरूपात महिलांना गौरवण्यात आले आहे.तसेच नारी शक्ती ही देशाचा भक्कम आधारस्तंभ आहे.असे मत आई प्रतिष्ठानच्या सचिव सौ.जयश्री गणेश तांबे यांनी व्यक्त केले.

नवदुर्गा पुरस्कार प्राप्त
पुढील महिला भगिनींचा समावेश आहे.
शोभा जगन्नाथ झेंडे,दिपाली उत्तम महामुलकर,सुषमा संदिपकुमार सावंत,
मंजुळा सागर जगताप,वैभवी प्रमोद भोसले,विद्या लक्ष्मण जगताप, शुभांगी उद्धव पवार,हसीना अब्दुल सत्तार पटेल, संगिता विष्णू रूपनवर इत्यादींचा समावेश आहे.

लाभे स्त्रीशक्तीचे वरदान,
दातृत्व कर्तृत्व महान,
व्हावी जगी कीर्ती,
तू नवशक्ती मांगल्यमूर्ती.

मानवतेच्या आणि कर्तृत्वाच्या मन मंदिरातील सेवाभावी तेवणाऱ्या अविरत ज्योतीस, नारी शक्तीस आई प्रतिष्ठानचा सलाम.
आपल्या कार्याचा वटवृक्ष असाच वाढत जावो.यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा!!
सौ.जयश्री तांबे
सचिव
आई प्रतिष्ठान वाठार निंबाळकर. ता. फलटण

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button