फलटण:-आई प्रतिष्ठान वाचन प्रेरणा स्पर्धेत कु.स्वरा संजय वांगडे राज्यात प्रथम.
सह - संपादक अशितोष चव्हाण

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
सह – संपादक अशितोष चव्हाण
आई प्रतिष्ठान वाचन प्रेरणा स्पर्धेत कु.स्वरा संजय वांगडे राज्यात प्रथम.
पुस्तक वाचल्याने चांगले संस्कार व चांगले विचार घडत असतात.छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त आई प्रतिष्ठान वाचन प्रेरणा समूह महाराष्ट्र राज्य यांचे वतीने राज्यस्तरीय वाचन प्रेरणा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित पुस्तकाचे वाचन करून त्या पुस्तकावर आधारित अभिप्राय २५ ते ५० ओळीमध्ये
स्वहस्ताक्षरात लेखन करून ते या स्पर्धेमध्ये सादर करावयाचे होते. या स्पर्धेमध्ये कु.स्वरा संजय वांगडे (प्रथम क्रमांक),
जि.प.केंद्र शाळा मेढा ता.जावली.जि.सातारा,
कु.वेदा विनायक चव्हाण
(द्वितीय क्रमांक)
लाहोटी कन्या प्रशाला, कराड ता.कराड जि.सातारा,कु.प्रिया गणेश भोसले
(तृतीय क्रमांक )
जि.प.केंद्र शाळा मेढा ता.जावली जि.सातारा
यांनी अतिशय सुंदर लेखन करून या स्पर्धेमध्ये उज्वल यश संपादित केल्याबद्दल त्यांचे मनापासून अभिनंदन करण्यात आले आहे. एकविसाव्या शतकाकडे वाटचाल करत असताना स्पर्धात्मक परीक्षा मध्ये तसेच विविध स्पर्धेमध्ये मुलींचे प्रमाण जास्त असल्याचे दिसून येत आहे. हे निश्चितच अभिमानास्पद बाब आहे. विद्यार्थ्यांसाठी आयोजित या नावीन्यपूर्ण उपक्रमाबद्दल पालकांनी या उपक्रमाचे स्वागत व कौतुक केले आहे. तसेच विद्यार्थ्यांच्या मनामध्ये वाचनाची गोडी निर्माण व्हावी यासाठी यापुढेही नावीन्यपूर्ण उपक्रम घेतले जातील तसेच सदर स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत आई प्रतिष्ठानच्या मुख्य कार्यक्रमात होणार असून सन्मान चिन्ह, सन्मानपत्र पुस्तक, पेन, मानाचा फेटा इत्यादी बक्षिसाचे स्वरूप असल्याचे आई प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री.गणेश तांबे यांनी सांगितले.