पिंपोडे बुद्र्क येथील लेंभे वस्ती/ गार्डी वस्ती येथे फौजी हस्ते ध्वजारोहण.
प्रतिनिधी अभिजीत लेंबे सातारा :-9822883516

पिंपोडे बुद्र्क येथील
लेंभे वस्ती/ गार्डी वस्ती येथे फौजी हस्ते ध्वजारोहण
पिंपोडे बुद्र्क/प्रतिनिधी/ अभिजीत लेंभे
देशाला स्वातंत्र होऊन 75 वर्षे पूर्ण झाली यामुळे भारत देशामध्ये विविध कार्यक्रम राबवण्यात आले. 13 आँगस्ट ते 15 आँगस्ट या कालावधी मध्ये अनेक कार्यक्रम झाले.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लेंभे वस्ती /गार्डी वस्ती (सावता नगर) येथे 15 ऑगस्ट च्या निमित्ताने ध्वजारोहण करून 75 वा अमृत महोत्सव या ठिकाणी उत्साहात साजरा करण्यात आला. त्यावेळी देशाचे रक्षण करणारे सी.आर.पी.एफ फौजी जयवंत नामदेव गार्डी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आला. शाळेच्या रंग कामासाठी पाच हजार रुपये देणगी देण्यात आली. मुलांना मार्गदर्शन करण्यात आले. आमच्या सारख्या आजी-माजी सैनिकांना ध्वजारोहणास प्रमुख पाहुणे म्हणून सन्मान दिल्याने खूप आदर वाटला अजून जोशाने देशाचे सेवा करावी असे वाटते मुलांना खाऊ वाटप करण्यात आला .त्यावेळी माजी सरपंच बाळासाहेब गार्डी ग्रामपंचायत सदस्य दीपक गार्डी अँड संतोष कुदळे विकास सेवा सोसायटी 1संचालक महेश गार्डी ,रमेश गार्डी ,शिवाजी लेंभे, सचिन लेंभे, माजी सैनिक सुधाकर गार्डी, योगेश जायकर, किरण यादव, युवा नेते निमेश गार्डी ,प्रवीण गार्डी ,पोलीस पाटील रामदास रमेश कुदळे, गार्डी ,दत्तात्रय गार्डी सुशांत गार्डी, नेताजी पाटील, शांताराम शिंदे ,
शाळेच्या मुख्याध्यापक सौ. सुजाता यादव, मँडम, त्रिंबक पाटील सर ,तसेच आजी /माजी सैनिक ,पालक वर्ग ,माजी विद्यार्थी ,ग्रामस्थ , महिला,सावतामाळी तरुण मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.