खटाव:-मायणी परिसरात रब्बी पिकाची काढणी वेगात सुरू.
ज्येष्ठ पत्रकार प्रा दिलीप पुस्तके महाराष्ट्र राज्य संघटक

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
ज्येष्ठ पत्रकार प्रा दिलीप पुस्तके महाराष्ट्र राज्य संघटक
मायणी परिसरात रब्बी पिकाची काढणी वेगात सुरू.
मायणी प्रतिनिधी—-मायणी परिसरात सतत येणारे आभाळ व अवकाळी पावसाच्या शक्यतेमुळे मायणी परिसरात काढणीला कमालीचा वेग आला आहे खरीप हंगामात वेळेवर पाऊस न झाल्याने खरीप हंगाम पूर्ण वाया गेला होता मात्र खरीप हंगामाच्या उत्तरार्धात वरून राजाने कृपा केल्याने ज्वारी, हरभरा ,गहू या अन्नधान्याच्या पिकाचा पेर दरवर्षीपेक्षा दुप्पट झाला आहे जमिनीत वेळेवर पाऊस झाल्याने ज्वारीचे, हरभऱ्याचे, पिक जोमात आली मात्र आता मजुराची चण चण भासू लागली एकरी दहा हजार रुपये ज्वारी काढणीला तर खुडणीला दर महिलेला तीनशे रुपये दर असल्याने अनेक शेतकऱ्यांनी आपल्या घरी ज्वारी काढणे पसंत केले त्यानंतर ज्वारी मळणी मिशनचा दर दीडशे रुपये पोते असून शेतकऱ्यांना रब्बी हंगाम सुगी करणे म्हणजे भीक नको पण कुत्र्य आवर अशी स्थिती निर्माण झाली आहे प्रारंभी नवीन ज्वारीचा दर बाजारात 3900 रुपये होता परंतु आता तो बत्तीशे रुपये झाला आहे तर वैरणीचा दर तीन हजार रुपये शेकडा असून चांगली मागणी आहे सध्या बळीराजाची सुगी सुरू असल्याने बाजारपेठ मात्र थंड आहे