वाई म.फुलेनगर येथे शाळा नं सात मध्ये आज सावित्री बाई फुले जयंती मोठ्या उत्साहात साजरी.
पत्रकार सारिका गवते वाई तालुका महिला अध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार सारिका गवते वाई तालुका महिला अध्यक्ष
RPS STAR NEWS
वाई म.फुलेनगर येथे शाळा नं सात मध्ये आज सावित्री बाई फुले जयंती मोठ्या उत्साहात साजरी.
.
वाई म.फुलेनगर येथे शाळा नं सात मध्ये आज सावित्री बाई फुले जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून सारीका गवते तर अध्यक्ष सातारा जिल्हा कामगार नेते तेजस जमदाडे उपस्थित होते. यावेळी सुरवातीस सावित्री बाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. कार्यक्रमास उपस्थित असलेल्या मान्यवरांचा शाळेच्या वतीने यथोचित सत्कार करण्यात आला. या वेळी शालेय मुलांची व अॅड. विजय जमदाडे, श्रीमती. सारीका गवते, तेजस जमदाडे यांची भाषणे झाली. या कार्यक्रमाचे औचित्य साधून शाळा क्र. ३ चे शिक्षक रियाज पटेल यांनी निवृत्ती घेतल्याने माझी नगरसेवक संदीप जावळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लक्षमण हुबंरे सर यांनी तर आभार सचिन पवार सर यांनी मानले. या वेळी स्मारक समिती अध्यक्ष रंगराव जमदाडे, संतोष जमदाडे, हेमंत भोरे….
रमेश जमदाडे,सचिन जमदाडे, चिंतामणी जमदाडे, दादा नेवसे, राहुल जमदाडे, सौ. माधुरी भोरे, श्वेता वैराट, सौ. मंदा कांबळे, सौ. यशोदा हिपळे, सौ ज्योती कोरडे, बेद्रेकर मॅडम, उज्वला हिंगणे. उपस्थित होते.