पुसेसावळी:-(थोरवेवाडी):-राहुल सावंत इंग्लिश मिडीयम स्कूल पुसेसावळी च्या सावित्रींनी उत्साहात केला बालिका दिन साजरा.
पत्रकार विनोद पाटील सातारा जिल्हा अध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार विनोद पाटील सातारा जिल्हा अध्यक्ष
RPS STAR NEWS
राहुल सावंत इंग्लिश मिडीयम स्कूल पुसेसावळी च्या सावित्रींनी उत्साहात केला बालिका दिन साजरा.
थोरवेवाडी पुसेसावळी :- राहुल सावंत इंग्लिश मीडियम स्कूल पुसेसावळी ता. खटाव जि.सातारा शाळेमध्ये 3 जानेवारी सावित्रीबाई फुले जयंती निमित्त इयत्ता सहावी ते नववीच्या सर्व विद्यार्थिनींनी बालिका दिन उत्साहात साजरा केला सर्व विद्यार्थिनींनी सकाळी सर्व वर्गांचा परिपाठ घेतला तसेच अध्यापनाचेही कार्य केले. दुपारच्या सत्रात सर्व विद्यार्थ्यांनी सावित्रीबाईंच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन केले याप्रसंगी विद्यार्थ्यांनी आपले अनुभव सांगितले.तसेच सौ. तडाके मॅडम,सौ. कदम मॅडम यांनी सावित्रीबाईंचे कार्य यावर आपले विचार मांडले.
मुख्याध्यापक श्री. हणमंत ठोंबरे सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. इयत्ता नववी ची विद्यार्थिनी कु. सारा खान हिने सर्वांचे आभार मानले. व कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. कार्यक्रमाचे नियोजन सौ.भोसले मॅडम यांनी केले. अशाप्रकारे बालिका दिन उत्साहात साजरा करण्यात आला.