ताज्या घडामोडी

सातारा:-साताऱ्यात अन्न व औषध तपासणी यंत्रणा सुविधा विना प्रशासन ….

ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा 

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

 ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

RPS STAR NEWS

साताऱ्यात अन्न व औषध तपासणी यंत्रणा सुविधा विना प्रशासन ….

सातारा दि: जनतेच्या विकासासाठी अनेक योजना राबवल्या जात आहेत. परंतु जनतेची भूक भागवण्यासाठी जे अन्न व आजारपणाचे औषध दिले जाते. त्याची तपासणी करणारी प्रयोगशाळा व इतर सुविधा सातारा जिल्ह्यात नसल्याने प्रशासन ठप्प झाल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यात चार मंत्री आणि एकही प्रयोगशाळा नाही. असे जगातील एकमेव जिल्हा असे त्याचे वर्णन केले जात आहे.
सातारा जिल्ह्यात हजारोंच्या संख्येने अधिकृत व अनाधिकृत अन्न व औषध विक्रेते आहेत. त्यांच्या तयार करण्यात आलेल्या अन्नाचे नमुने घेऊन त्याची तपासणी करणारी अन्नसुरक्षा मानक कायदा अस्तित्वात आहे. परंतु केंद्र शासन मान्यता असलेली प्रयोगशाळा फक्त पुण्यामध्ये असल्यामुळे नमुने पाठवल्यानंतर १४ दिवसात त्याचे अहवाल प्राप्त होणे गरजेचे आहे. परंतु त्या ठिकाणी नमुन्याची गर्दी होत असल्याने चार महिने अहवाल येण्यास लागतात. त्यामुळे कारवाई करण्यास विलंब होत असतो. आरोप प्रत्यारोप सुद्धा केले जातात. नमुने घेतलेले अन्न नष्ट होण्याची भीती आहे. एवढेच नव्हे तर सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा व कोकणात सुद्धा केंद्रशासन मान्यता प्राप्त प्रयोगशाळा नसल्यामुळे पुण्याच्या प्रयोगशाळेमध्ये जप्त केलेले अन्न व औषध नमुने पाठवावे लागतात.
अन्न विश्लेषक पद रिक्त असल्यामुळे एक अधिकारी महिन्याला दहा ते तीस नमुने तपासणी करू शकतो. तसं पाहिलं तर कर्मचाऱ्यांची पद रिक्त असल्याने दररोज नमुने घेणे शक्य नसल्यामुळे या खात्याची अवस्था फार बिकट झालेली आहे. पाचगणी महाबळेश्वर मध्ये सरास मुदत संपलेले खाद्यपदार्थ विक्री होत आहे. याबाबत त्याची कल्पना दिल्यानंतर ही बाब उघडकीस आली.
सर्वात अत्यंत काळजीपूर्वक कामकाज एकेकाळी सातारा जिल्ह्यातील अन्न व औषध प्रशासन करत होते. आता अन्न व औषध प्रशासनाला काही रिक्त पद भरून ते सक्षम करणे म्हणजे खऱ्या अर्थाने जनतेच्या आरोग्याची काळजी घेणे. या उद्देश आहे .पण, त्याकडे फारसे गांभीर्याने पाहिले जात नाही.
प्रथमच सातारा जिल्ह्यात चार मंत्री असताना अन्न व औषध प्रशासनाची चार चाकी वाहन पंचर झालेली आहेत. त्यामुळे ते वाहन जागेवरून हालत नाही. ही शोकांतिका आहे. टी.सी.एल. पावडर सारख्या ग्रामीण भागातील आरोग्याची काळजी घेणाऱ्या पावडरची तपासणी करणारी यंत्रणा नाही. काही ठेकेदारांना टी.सी.एल. पावडर पुरवठा करण्याचा ठेका दिला आहे. पण, पावडरची गुणवत्ता तपासणी होत नाही. सार्वजनिक दल पाणीपुरवठ्याच्या पाण्याची नमुन्याची मोजमाप करणे शक्य होत नाही.
सातारा जिल्ह्यात कोरोना काळात सर्वाधिक चांगले काम अन्न व औषध प्रशासनाने केल्यामुळे अनेकांचे प्राण वाचलेले आहेत. आता कोरोनामध्ये ज्या काही ऑक्सिजन मशीन, टेंपरेचर मीटर व इतर मशीन देण्यात आलेले आहेत. सध्या धुळखात पडून आहेत. तसेच दुग्ध तपासणी किट नसल्यामुळे राजेरोसपणाने अनेक भेसळयुक्त दूध पुणे, मुंबई ,नाशिक शहराकडे घेऊन जात आहेत. याकडेही कुणाचे लक्ष नाही.
सदर पाच हजार ते दहा हजार लिटरचे दूध टँकर मधून घेऊन जात असताना त्याची तपासणी सुद्धा होत नाही. गेले अनेक तालुक्याच्या ठिकाणी वर्षानुवर्षे जनता दरबारच भरत नसल्यामुळे लोकप्रतिनिधीला जाब कोण विचारणार? असा सामान्यांना प्रश्न पडला आहे. लोकप्रतिनिधीच्या कार्याची दखल घेणे हा त्यांचा अधिकार आहे. परंतु मूलभूत प्रश्न ऐवजी राजकीय प्रश्न जास्त मांडून लोकप्रतिनिधीच्या चांगल्या कार्यक्षमतेची हत्या केली जात आहे. याबाबत ही समाज माध्यमातूनच नागरिकांकडून आवश्यक सूचना येत आहेत.त्याचा विचार करणे गरजेचे आहे. औषध व अन्न तपासणी करण्यासाठी लागणारी यंत्रणा सातारा जिल्ह्यात बसवली तर मोठ्या प्रमाणात शीट व आरोग्य हानिकारक असलेल्या पदार्थांवर तातडीने कारवाईसाठी निर्णय घेणे आवश्यक होणार आहे. या खात्यामधील रिक्त पदे केव्हा भरणार? हा सुद्धा कळीचा मुद्दा झालेला आहे. दरम्यान, सातारा जिल्ह्यातील वार्षिक यात्रा व सार्वजनिक कार्यक्रम तसेच पर्यटन स्थळे या ठिकाणी विक्री करत असलेल्या अन्नपदार्थ व औषधाची तपासणी करण्यासाठी आता पथक कार्यरत करण्यात आले आहे. ग्राहकांनी सुद्धा मुदत संपलेले खाद्यपदार्थ जर कोणी विकत घेत असतील तर न विसरता तक्रार केल्यास ते खाद्यपदार्थ नष्ट करून त्यांच्यावर कारवाई केली जाईल. अशी माहिती सातारा जिल्हा आयुक्त तू ना शिंगाडे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली आहे. सध्या लहान मुलांच्या खाद्यपदार्थाच्या अनेक घरगुती व मल्टिनॅशनल कंपनी अस्तित्वात आलेले आहेत. परंतु त्यांची तपासणी होत नसल्याने मुलांच्या आरोग्यावरही परिणाम होत असल्याची माहिती नामांकित हॉस्पिटलच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली आहे.

ACLS TIMES” YOUTUBE चॅनेल ला LIKE SUBSCRIBE आणि COMMENT करा. 🙏

ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन

—&————————————–
फोटो सातारा जिल्हा अन्न व औषध प्रशासनाची बंद पडलेली चार चाकी वाहन (छाया- अजित जगताप, सातारा)

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button