मायणी:-ढगाळ वातावरणामुळे मायणी परिसरात थंडी गायब, पिकावर विपरीत परिणाम.
ज्येष्ठ पत्रकार प्रा.दिलीप पुस्तके राष्ट्रीय संघटक

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
ज्येष्ठ पत्रकार प्रा.दिलीप पुस्तके राष्ट्रीय संघटक
RPS STAR NEWS
ढगाळ वातावरणामुळे मायणी परिसरात थंडी गायब, पिकावर विपरीत परिणाम.
मायणी प्रतिनिधी—–राज्यात तुरळक ठिकाणी वादळी पावसासह गारपिटीने तडाका दिल्यानंतर अवकाळीचे सावट दूर झाले असले तरी ढगाळ वातावरणामुळे किमान तापमानात वाढ झाल्याने मायणी परिसरातील थंडी गायब झाली आहे हवामान खात्याने किमान तापमानात चढ-उतार होण्याची शक्यता वर्तविल्याने कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे या विचित्र हवामानामुळे मायणी परिसरात काही वेळा ढगाळ वातावरण तयार होत आहे तर काही वेळा कडक ऊन पडत असून उकाडा जाणवत आहे याचा परिणाम रब्बी पिकावर झाला असून ज्वारीवर चिकटा, करपा ,मावा ,तांबेरा इत्यादी रोगांचा परिणाम झाला आहे हरभऱ्यावर घाटी अळीचा प्रादुर्भाव झाला असून सातत्याने ढगाळ वातावरण टिकून राहिल्याने रोगाचा परिणाम जाणवू लागला आहे याचा परिणाम उत्पन्नावर होऊ शकतो. चिकटा रोगामुळे सायंकाळी लहान कीटकांचा वावर रस्त्यावर येऊ लागल्याने दुचाकी वाहन चालकांना प्रवास करणे कठीण होऊ लागले आहे.