ताज्या घडामोडी

कुडाळ:-मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी कार्यकर्त्याच्या आजारी बहिणीची केली विचारपूस …

ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा 

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

 ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

RPS STAR NEWS

मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी कार्यकर्त्याच्या आजारी बहिणीची केली विचारपूस …

कुडाळ दि:
महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी आपल्या व्यस्त कार्यक्रमातून वेळ काढून काल कुडाळ ता. जावली येथे जंगम हॉस्पिटलमध्ये जाऊन निष्ठावंत कार्यकर्ता व एका बांधकाम व्यवसायिक यांच्या आजारी बहिणीची भेट घेतली. तसेच वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रमोद जंगम यांच्या कडून लाडक्या बहिणीच्या उपचार व तब्येतीबद्दल माहिती घेऊन विचारपूस केली.
जावळी तालुक्यातील कुडाळ येथील बांधकाम व्यवसायिक यांची ४७ वर्षाची सखी बहीण बरेच दिवसापासून आजारी असल्याने अंथरुणाला खिळून आहेत. व्यवसाय सांभाळून मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांचा एक कार्यकर्ता आपल्या आजारी व लाडक्या बहिणीची काळजी घेत आहेत. तसेच त्यांच्या औषध उपचारसाठी स्वतः झटत आहेत. अशा कार्यकर्त्याचे नैतिक बळ पाहून स्वतः मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी कार्यकर्त्याच्या लाडक्या बहिणीचे कुडाळ येथील जंगम हॉस्पिटलमध्ये स्वतः जाऊन भेट घेतली. तसेच त्यांच्या औषध उपचाराबाबत संपूर्ण सहकार्य करण्याचा शब्द दिला.
. विधानसभा निवडणुकीच्या काळामध्ये आपल्या आजारी बहिणीची देखभाल तसेच शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या जावळी तालुक्यातील प्रचार यंत्रणेमध्ये सहभागी होणाऱ्या या कार्यकर्त्यांच्या प्रचारामुळे मताधिक्यामध्ये वाढ झालेली आहे. याची जाणीव ठेवून सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी आपल्या व्यस्त कार्यक्रमातून सुद्धा वेळ काढून कुडाळ येथील हॉस्पिटल मध्ये उपचार घेत असलेल्या कार्यकर्त्याच्या बहिणीची भेट घेतली. त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉ. प्रमोद जंगम यांच्या कडून उपचारा बाबत माहिती घेतली . तसेच रक्ताचे नाते नसले तरी माणुसकीचे नाते जपणारी आपलीच बहीण मानून कार्यकर्त्याच्या कुटुंबियांना भेटून दवा आणि दुवा कामी यावा यासाठी मनोभावे दिलासा दिला.
छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरा पगड जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन स्वराज्य स्थापन केले. त्यांच्या विचारांचे वारसदार म्हणून सध्या शिवेंद्रसिंहराजे भोसले हे सर्व जाती धर्मातील लोकांसाठी खऱ्या अर्थाने लोकप्रतिनिधी बनली आहेत . जात व धर्म न पाहता कार्यकर्ता हेच माझे कुटुंबं मानून मदतीचा हात दिला आहे. त्यांच्या विचाराचे अनुकरण इतर कार्यकर्त्यांनी करावे अशीच ही घटना आहे. राज्याचा कॅबिनेट मंत्री हे स्वतः हॉस्पिटल मध अत्यंत साधेपणाने आलेले पाहून अनेकांना त्यांच्या साधेपणाचा अनुभव आला. राजासारखे मन मनासारखा राजा याची प्रचिती आल्याची माहिती त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांनी दिली.
——-&——————————————-
फोटो -जग्गम हॉस्पिटलमध्ये कार्यकर्त्याच्या बहिणीचे विचारपूस करताना मंत्री व वैद्यकीय अधिकारी (छाया- अजित जगताप कुडाळ)

ACLS TIMES” YOUTUBE चॅनेल ला LIKE SUBSCRIBE आणि COMMENT करा. 🙏

ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button