ताज्या घडामोडी

पुसेगाव:-महात्मा फुलेंच्या कुलभूमीत मंत्री गोरे यांचे फुलांचा वर्षाव करून स्वागत………

ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा 

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

 ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

RPS STAR NEWS

महात्मा फुलेंच्या कुलभूमीत मंत्री गोरे यांचे फुलांचा वर्षाव करून स्वागत………

पुसेगाव दि: राज्याचे ग्रामीण विकास व पंचायत राज कॅबिनेट मंत्री नामदार जयकुमार भगवानराव गोरे यांचे क्रांतीकारक महात्मा ज्योतिबा फुले यांच्या कुलभूमीत भूमिपुत्रांच्या वतीने त्यांच्यावर फुलांचा वर्षाव करून भव्य स्वागत करण्यात आले. नायगाव येथे ज्ञान ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकानंतर त्यांनी सर्व युगापुरुषांच्या प्रतिमेला अभिवादन करून खऱ्या अर्थाने समता मानणारा मंत्री म्हणून ख्याती मिळवल्याची चर्चा सुरू झालेली आहे.
यावेळी माजी खासदार रणजीत नाईक निंबाळकर फलटणचे आमदार सचिन कांबळे- पाटील, भाजप जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांच्या सह भूमिपुत्र किसन गोरे आदी मान्यवर उपस्थित होते.
राज्याच्या मंत्रिमंडळात निवड झाल्यानंतर प्रथमच महात्मा फुले यांच्या कुलभूमीत मंत्री म्हणून नामदार जयकुमार गोरे यांनी महात्मा फुले यांच्या पुतळ्याला जाऊन विनम्र अभिवादन केले. या वेळेला महात्मा फुले की जय घोष… करण्यात आला .माजी उपमुख्यमंत्री व आमदार छगन भुजबळ यांच्या प्रयत्नाने खटाव तालुक्यातील कटगुण कुलभूमीत महात्मा फुलेंचा पुतळा बसविण्यात आलेला आहे. दि: ११ एप्रिल त्यांच्या पुण्यतिथी दिनी या ठिकाणच्या स्मारकाचे उर्वरित काम पूर्ण करण्याचा मानस यावेळी मंत्री गोरे यांनी ग्रामस्थांशी बोलताना व्यक्त केला.
अत्यंत भावनिकरित्या झालेल्या या सत्कार सोहळ्याला किसन गोरे,योगेश गोरे ,अमर गोरे, दत्ता गायकवाड, सुधीर गोरे, प्रल्हाद साळुंखे, अर्जुन गायकवाड, अभिजीत गोरे, रामचंद्र गायकवाड यांच्यासह सौ शोभा गोरे, सौ कोमल गोरे, सौ माधुरी गोरे, सौ मीना गोरे व महिला वर्ग, युवक आणि पुरोगामी विचारांचे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. ग्रामविकास मंत्री नामदार जयकुमार गोरे यांनी कुलभूमीला भेट दिल्याबद्दल त्यांचे ग्रामस्थांनी आभार मानून सत्कार केला.
————-&———————————
फोटो कटगुण येथील फुले स्मारकाला अभिवादन करताना मंत्री जयकुमार गोरे (छाया- निनाद जगताप, कटगुण)

ACLS TIMES” YOUTUBE चॅनेल ला LIKE SUBSCRIBE आणि COMMENT करा. 🙏

ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button