आरोग्य व शिक्षणग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

मिरज:-जिल्हा परिषद राज्य मॉडेल स्कूल विजयनगर या शाळेचे स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न.

पत्रकार योगेश माने कोरेगाव तालुका अध्यक्ष 

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

 पत्रकार योगेश माने कोरेगाव तालुका अध्यक्ष

RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृती )

जिल्हा परिषद राज्य मॉडेल स्कूल विजयनगर या शाळेचे स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न.

जिल्हा परिषद राज्य मॉडेल स्कूल विजयनगर या शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन म्हणजेच कला उत्सव 2025 मोठ्या दिमाखात साजरा झाला .इ 1 ली ते 8वी पर्यंतच्या जवळ जवळ 320 मुलां मुलीचा सहभाग या गॅदरिंग मध्ये होता . या स्नेहसंमेलनमध्ये उत्कृष्ट पद्धतीचे नृत्यांचे अविष्कार मुलांनी सादर केले . मधुर व गोड वाणीच्या निवेदनाने तर त्यात आणखी रंजकता आली . नाटकातील मुलांचे अभिनय तर हास्याचा वर्षाव करून गेले . त्यात भर म्हणून माझ्या विजयनगर गावातील लोकांनी बक्षिसांचा जणू पाऊसच पाडला .लहान मुलांचे नृत्याचे सादरीकरण नादखुळाच होते . आई या विषयावरील नृत्यात तर शिक्षकासहित अनेक पालकांचे डोळे पाणावले होते . मोठ्या मुलांच्या डान्स मध्ये तर नाविण्यता व अचूकता होती .काही मुले तर पहिल्यांदाच डान्स करत होते त्यावेळेस पालकांच्या चेहर्‍यावरील समाधान एक प्रकारचा आनंद देवून जात होते . स्नेहसंमेलन पाहण्यासाठी जमलेली तुडुंब गर्दी तर कार्यक्रम पाहण्यासाठी सांगली जिल्हयातून आलेल्या शिक्षकांचे लक्ष वेधून घेत होती.


उत्कृष्ट नियोजन , त्याची योग्य पद्धतीने अमंलबजावणी , सुशांत सर व अजय सर ( सर्जा-राजा ) यांचा योग्य डान्स सराव , मुख्याध्यापक व शिक्षकांचे कष्ट- अचूक मार्गदर्शन, शालेय व्यवस्थापन समिती व ग्रामपंचायत विजयनगरची अनमोल साथ ,माझ्या विजयनगर गावातील लोकांची उत्तम मदत, उत्कृष्ट स्टेज व साऊंड व्यवस्था यामुळेच दर्जेदार व अलौकिक कार्यक्रम सादर करता आले.

शेवटी एवढचं म्हणेण एकत्रित येणे ही सुरुवात असते.एकत्रित रहाणे ही प्रगती असते,एकत्रित काम करणे हे यशाचे लक्षण असते.

पुन्हा एकदा सर्व बालकलाकारांचे,त्यांच्या पालकाचे ,सर्व देणगीदारांचे , सर्व ग्रामस्थांचे खूप खूप धन्यवाद म्हणून कार्यक्रम संपला असे जाहीर केले.

RPS STAR NEWS YOUTUBE चॅनेल ला LIKE, FOLLOW, SUBSCRIBE आणि COMMENT करा.

ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button