पुणे:- कात्रज -रस्त्याची दुरुस्ती रखडल्याने वाहतूक सेवा विस्कळीत.
प्रतिनिधी रफिक शेख पुणे:-9021132121

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-८२०८७१७४८३.
रस्त्याची दुरुस्ती रखडल्याने वाहतूक सेवा विस्कळीत.
कात्रज, दि. 6 (अब्दुलरहिम शेख ) कात्रज कोंढवा रस्त्यावर चितळे डेअरीच्या पुढील चौकाजवळील रस्ता दुरुस्तीसाठी उकरला असून गोकुळनगर परिसरामधील वाहतूक कोंडी होत असूनही संबंधितांचे याकडे दुर्लक्ष होत आहे.
संबंधित अधिकारी आणि पदाधिकारी वर्गाने गोकुळनगर लगतचा रस्ता दुरुस्तीसाठी उकरला असून वेळेत दुरुस्त न केल्याने वाहतुकीची कोंडी होत असूनही संबंधितांचे याकडे दुर्लक्ष होत आहे तसेच कात्रज ते खडीमशीन चौकापर्यंत आणि तेथून पुढील रस्ता सुध्दा वाहतूक कोंडीमुळे विस्कळीत झाली असल्याने नागरिकांना त्रासदायक ठरला आहे.
त्याचप्रमाणे प्रदुषण वाढत असल्याने नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे संबंधित पदाधिकारी वर्गाने याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा येथील नागरिकांकडून देण्यात आला आहे.