रामकृष्ण वरुडे उद्यान पंडित पुरस्काराने सन्मानित
प्रतिनिधि:- दिलिप पुस्तके सातारा (विभाग प्रमुख)

रामकृष्ण वरुडे उद्यान पंडित पुरस्काराने सन्मानित मायनी प्रतिनिधी___खटाव तालुक्यातील विशेषता निमसोड परिसरातील द्राक्ष बागायतदार रामकृष्ण वरुडे यांना द्राक्ष पिकांच्या मूल्य साखळी दिलेल्या योगदानाबद्दल राज्यपाल भगतसिंग कोसारी यांच्या हस्ते व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार कृषी मंत्री दादा भुसे कृषी संचालक यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्यान पंडित पुरस्काराने नाशिक येथे सन्मानित करण्यात आले द्राक्ष बागेचे आयातदार भेटी,ग्लोबल गॅप प्रमाणीकरण व पॅक हाउस मध्ये अपेडा प्रमाणिकरण या विषयी कागदपत्राची योग्य काळजी घेत निर्यातीच्या साखळीतील जवाबदार शेतकरी म्हणून पहिल्या वर्षी 300 टन निर्यातक्षम द्राक्ष नेदरलँड येथे स्वतःच्या एक्सपोर्ट कंपनीमार्फत निर्यात केली एग्रीकल्चर कॉलेज बारामती चे व्यवस्थापक राजेंद्र पवार यांनी कोल्डस्टोरेज साठी कंपनीच्या कामाला भेट दिली व पुढील कामास शुभेच्छा दिल्या अधिक माहिती देताना अधिक माहिती देताना वरूडे यांनी सांगितले की 19 2019 आली ग्रोप्लस स्वतःची कंपनी स्थापन केली ग्रोप्लस याचा अर्थ अधिक वाढ आणि आपण शेतकरी आहोत स्वतःचा मार्ग स्वतः एक्सपोर्ट करीत आहोत गेल्यावर्षी 14 कंटेनर युरोप खंडात पाठविण्यात आली यावर्षी 45 कंटेनर पाठवण्याचे उद्दिष्ट आहे अधिक माहिती देताना त्यांनी सांगितले की आमचा व्यवसाय शेती आहे मुलांनी पण ऍग्रो चे शिक्षण घेतली आहे परदेशातील शिक्षणामुळे आधुनिक शेती करणे परदेशी मॉल पाठवणे सोपी झाली आहे भविष्यात आम्ही स्वतःचा सह्याद्री अग्रो एक्सपोर्ट कोल्ड स्टोरेज मधून स्वतःचे एक्सपोर्ट कंपनी मार्फत सातशे वीस टन द्राक्ष निर्यातीचे उद्दिष्ट ठेवले असल्याचे सांगून या व्यतिरिक्त युरोपियन देशांमध्ये मूल्य साखळी करून भाजीपाला फळे निर्यात करणार असल्याचे त्यांनी सांगितले खटाव तालुक्यातील मंडळ कृषी अधिकारी दिलीप दाभाडे व जिल्हा कृषी अधिकारी गुरुदत्त काळे तसेच तालुका कृषी अधिकारी यांची बहुमोल मार्गदर्शन लाभले असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले