ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

यशवंतराव चव्हाण भूषण पुरस्कार राज्याचे सहकार व पणन मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री मा. नामदार बाळासाहेब पाटील यांना राज्याचे उपमुख्यमंत्री मा. नामदार अजितदादा पवार यांच्या शुभहस्ते

प्रतिनिधि:- अमोल गुरव खटाव

यशवंतराव चव्हाण भुषण पुरस्कार समिती मिरज यांच्यावतीने दिला जाणारा यावर्षीचा अत्यंत प्रतिष्ठेचा *’यशवंतराव चव्हाण भुषण’ पुरस्कार* राज्याचे सहकार व पणन मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री *मा.नामदार बाळासाहेब पाटील* यांना आज रविवार दिनांक १५ मे २०२२ रोजी मिरज येथील बालगंधर्व नाट्यगृहात राज्याचे उपमुख्यमंत्री मा.नामदार अजितदादा पवार यांच्या शुभहस्ते व विशालबाबू पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला.

याप्रसंगी आमदार अनिलभाऊ बाबर, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष विशाल पाटील, रोहित आर.आर.पाटील, महापौर दिग्विजय सुर्यवंशी, माजी महापौर किशोरदादा जामदार, इंद्रिस नायकवडी, सुरेशबापू आवटी, निरंजन आवटी, संदीप आवटी, संजय मेंढे, आनंदा देवमाने, तानाजी सातपुते, अभिजित हारगे, यशवंतराव चव्हाण भुषण पुरस्कार समितीच्या अध्यक्षा श्रीमती जयश्रीवहिनी मदनभाऊ पाटील, उपाध्यक्ष डॉ.राजेंद्र मेथे, सचिव विठ्ठल पाटील(काकाजी), सौ.मालुश्री पाटील, प्रशांत यादव, लालासाहेब पाटील, तानाजीराव जाधव, जयवंतराव थोरात, गोविंदराव थोरात, विजयराव निकम, शिवाजीराव जाधव, दिगंबर डांगे, अनुज पाटील, गौरव पाटील, मंगेश पाटील तसेच इतर पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.

मिरज येथील यशवंतराव चव्हाण भुषण पुरस्कार समितीच्या वतीने, यशवंतराव चव्हाणसाहेबांच्या नावाने दिला जाणारा ‘यशवंतराव चव्हाण भुषण पुरस्काराचा’ मी आदरपूर्वक सन्मान करून हा पुरस्कार कराड – उत्तरसह महाराष्ट्रातील जनतेला समर्पित करतो अशा भावना यावेळी सहकार व पणन मंत्री मा.नामदार बाळासाहेब पाटील यांनी व्यक्त केल्या.

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button