वैजापूर येथे करुणा निकेतन शाळेमध्ये 112 वैजापूर विधानसभा मतदारसंघ सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने प्रशिक्षण आयोजित
पत्रकार बाळासाहेब सरोदे मराठवाडा संघटक

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार बाळासाहेब सरोदे मराठवाडा संघटक
RPS STAR NEWS
वैजापूर येथे करुणा निकेतन शाळेमध्ये 112 वैजापूर विधानसभा मतदारसंघ सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने प्रशिक्षण आयोजित.
वैजापूर- दिनांक 12 /11/ 2024 रोजी 112 वैजापूर विधानसभा मतदारसंघ सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने दोन सत्रात दुसरे प्रशिक्षण करुणा निकेतन शाळा वैजापूर येथे मा. निवडणूक निर्णय अधिकारी डॉ अरुण जऱ्हाड तसेच सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी श्री सुनील सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली . यावेळी मा. श्री उज्वल कुमार सिंग निवडणूक निरीक्षक यांनी प्रशिक्षण स्थळी भेट देऊन उपस्थित मतदान अधिकारी कर्मचारी यांना मार्गदर्शन केले. प्रशिक्षणा दरम्यान पीपीटी द्वारे व प्रत्यक्ष ईव्हीएम मशीन हाताळणी करून मतदान कर्मचारी यांना प्रशिक्षित करण्यात आले. सदर प्रशिक्षण देताना विविध नमुने भरून घेण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. मतदान यंत्राची जोडणी ही प्रत्यक्ष डेमो व व्हिडिओ दाखवून समजावून सांगण्यात आली. कलर कोड मॅच कसा करावा याचेही प्रात्यक्षिक करून दाखवण्यात आले. मार्ग सुनिश्चित करणे मतदान यंत्र योग्य ठिकाणी ठेवणे ,स्थानिक ठिकाणी कोणाकडे निवासासाठी मतदान अधिकारी कर्मचारी यांनी जाऊ नये ,सकाळी 5.30 वाजता अभिरुप मतदान म्हणजेच. mock poll घ्यावे 7.00वाजता सदर मतदान प्रक्रिया सुरू करावी .प्रत्येक दोन तासाने मतदानाची आकडेवारी द्यावी इत्यादी माहिती पीपीटी द्वारे देण्यात आली. मतदार सहाय्यक केंद्र बी एल ओ यांच्याशी ओळख करून घ्यावी. मतदान केंद्रावर पोहोचल्यावर करावयाची कारवाई सविस्तर समजावून सांगण्यात आली तसेच मतदान संपल्यानंतर क्लोज बटन बंद करावे विविध लिफाफे सुव्यवस्थितरित्या भरून संविधानिक व असविधानिक अशी वर्गवारी करावी इत्यादी मार्गदर्शन करण्यात आले तसेच ज्या ठिकाणाहून साहित्य स्वीकारले त्याच ठिकाणी साहित्य जमा करावे .सदर कामात गोंधळ करू नये कोणत्याही प्रकारे चूक होता कामा नये या कडे संबंधित अधिकारी कर्मचारी यांनी लक्ष द्यावे .क्षेत्रीय अधिकारी यांची जबाबदारी त्यांनी पार पाडावी व अचूक कामकाज करावे असे प्रशिक्षण स्थळी सांगण्यात आले. क्षेत्रीय अधिकारी व मतदान अधिकारी कर्मचारी यांनी योग्य समन्वय साधूनआणि मतदान प्रक्रिया पार पाडावी अशा सूचना देण्यात आल्या. तसेच कर्मचाऱ्यांच्या टपाली मतदानासाठी करुणानिकेतन येथे सुविधा केंद्र उघडण्यात आले असून कर्मचाऱ्यांना टपाली मतदानाची सोय करण्यात आली आहे .या ठिकाणी छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील टपाली मतदानाकरिता एकूण तीन कक्ष व उर्वरित जिल्ह्यातील मतदार संघाकरिता एक कक्ष उघडण्यात आलेला आहे यावेळी गटशिक्षणाधिकारी श्री उशीर सर व शिक्षण विस्तार अधिकारी श्री मनीष दिवेकर नायब तहसीलदार श्री भालचिन मॅडम नायब तहसीलदार श्री सुरज कुमावत श्री प्रदीप दुशिंग सर सर्व क्षेत्रीय अधिकारी सर्व नोडल अधिकारी मास्टर ट्रेनर उपस्थित होते.