वाई किसनवीर महाविद्यालयामध्ये सातारा हँडबॉल स्पर्धा उत्साहात संपन्न.
पत्रकार वैष्णवी शिंदे पुणे जिल्हा महिला PRR

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार वैष्णवी शिंदे पुणे जिल्हा महिला PRR
RPS STAR NEWS
दि ०९ वाई
किसनवीर महाविद्यालयामध्ये सातारा हँडबॉल स्पर्धा उत्साहात संपन्न.
शनिवार दि ०९ नोव्हेंबर २०२४ रोजी किसनवीर महाविद्यालयामध्ये शिवाजी विद्यापीठ सातारा झोनल हँडबॉल (पुरुष) स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेसाठी सातारा जिल्ह्यातून विविध महाविद्यालयातील एकूण ०६ संघ सहभागी झाले होते. या स्पर्धेचे उद्घाटन ॲड. रमेश यादव यांच्या हस्ते संपन्न झाले. तसेच उद्घाटन प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गुरुनाथ फगरे यांनी अध्यक्षस्थान भूषवले व स्पर्धेसाठी सातारा झोनचे सचिव माणिक गोरवे आणि विविध महाविद्यालयातील आलेले संघ व्यवस्थापक हे देखील उपस्थित होते. या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक शंकरराव जगताप महाविद्यालय, वाघोली यांनी संपादन केला. तसेच द्वितीय क्रमांक शरदचंद्र पवार महाविद्यालय, लोणंद व तृतीय क्रमांक किसन वीर महाविद्यालय, वाई संघाने संपादन केला. तसेच चतुर्थ क्रमांक गव्हर्नमेंट कॉलेज, कराड यांनी मिळवला. या कार्यक्रमाचे बक्षीस वितरण महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य प्रो. ज्ञानदेव झांबरे यांच्या हस्ते संपन्न झाले. या चार यशस्वी संघांची शिवाजी विद्यापीठ अंतर्गत इंटर झोनल स्पर्धेसाठी निवड झाली.